'बार बार हाँ, बोलो यार हाँ अपनी जीत हो..' 10 सप्टेंबरसाठी टीम इंडियाचा कसून सराव.. पाहा फोटो

Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत सुपर - 4 मध्ये भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याकडं करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 10 सप्टेंबरला कोलंबोत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी (Team India) कसून सराव केलाय.

| Sep 07, 2023, 22:16 PM IST
1/7

एशिया कप 2023 स्पर्धेत आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाला आपली पूर्ण ताकद दाखवण्याची संधी मिळालेली नाही. 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसाने खेळ मांडला. तर नेपाळविरुद्धच्या सामन्यातही अधून-मधून पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा एकदा सुपर-4 मध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 

2/7

येत्या 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहेत. श्रीलंकेतल्या कोलंबोत हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करतायत. नेट प्रॅक्टिस आणि जीममध्ये खेळाडू घाम गाळतायत. याची एक झलक बीसीसीआयने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दाखवली आहे. 

3/7

सुपर-4 फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंजिया 5 सप्टेंबरला कोलंबोत दाखल झाली. 10 सप्टेंबरला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. 6 सप्टेंबरला टीम इंडियाने विश्रांती घेतली, त्यानंतर सात सप्टेंबरला खेळाडूंनी पूर्ण जोमाने सराव केला. 

4/7

बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर टीम इंजियाच्या मेहनतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. अडीच मिनिटांच्या या व्हिडिओत रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर यांनी जीममध्ये घाम गाळला.  स्ट्रेचिंग, वेट ट्रेनिंग सारखा व्यायाम केला

5/7

तर काही खेळाडूंनी इनडोअर नेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगचा कसून सराव केला.  केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव यांनी इन्डोर प्रॅक्टिस केली. 

6/7

कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअममध्ये पावासामुळे पाणी साचलं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना जीम आणि इनडोअर क्रिकेट सरावावर भर द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून कोलंबोत मुसळधार पाऊस आहे. तसंच पुढचे दहा दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

7/7

2 सप्टेंबरला झालेली भारत-पाकिस्तान मॅच पावसात वाहून गेली.. त्यादिवशी टीम इंडियाची टॉप ऑर्डर लवकर आऊट झाली. मात्र असा चमत्कार दरदिवशी घडत नाही, याची जाणीव पाकिस्तानलाही आहे.. भारतीय टीम आणि भारतीय खेळाडूंचा सध्याच्या फॉर्म पाहता पाकिस्तानला धडकी भरणं स्वाभाविक आहे.