मोहम्मद सिराजने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Asia Cup 2023 Final : एशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर (India beat Sri Lanka) 10 विकेटने मात करत एशिया कपचं  जेतेपद पटकावलं. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत ऑलआऊट झाला. विजयाचं हे माफक आव्हान टीम इंडियाने सहाव्याच षटकात पुर्ण केलं. या सामन्यात मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) नावावर अनेक विक्रम जमा झालेत. 

| Sep 17, 2023, 18:54 PM IST
1/7

एशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका आमने सामने होते. या सामन्यात भारताने लंकेचा तब्बल 10 विकेट पराभव करत एशिया कपवर नाव कोरलं.

2/7

टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो वेगवागन गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजच्या वादळापुढे लंकेचा संघ पालापोचाळ्यासारखा उडून गेला. 

3/7

मोहम्मद सिराजने अवघ्या सात धावा देत सहा विकेट घेतल्या. यात एकाच षटकात चार विकेट घेण्याचा विक्रम त्याने केला. 

4/7

सामन्याच्या चौथ्या षटकात सिराजने पथुम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरित असलंक आणि धनंजय डिसिल्व्हा यांची विकेट घेतली.

5/7

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात एकाच षटकात चार विकेट घेण्याची कामगिरी करणारा सिराज हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

6/7

याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान पाच विकेट घेण्याचा विक्रमही मोहम्मद सिराजने केला आहे. 

7/7

मोहम्मद सिराजने अवघ्या 16 चेंडूत पाच विकेट घेतल्या. सिराजने सात षटकात 21 धावा देत 6 विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.