Auto Expo 2023 मध्ये मारुति, एमजीसह इतर कंपन्यांनी दाखवली गाड्यांची झलक, पाहा फोटो

Auto Expo 2023: ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक सरस गाड्या पाहता येतील. मारुती सुझुकीसह इतर कंपन्यांनी बुधवारी त्यांच्या इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण केले. स्टायलिश लूक असलेल्या इलेक्ट्रिक कारची रेंजही तितकीच जबरदस्त आहे. चला, जाणून घेऊयात

Jan 11, 2023, 19:18 PM IST
1/6

Auto Expo 2023

मारुति सुझुकीने बुधवारी ऑटो एक्सपोमध्ये EVX ही कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले. मारुतिची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. 2025 पर्यंत ही कार (Electric SUV eVX) बाजारात दाखल होईल, असा कंपनीने दावा केला आहे.

2/6

Auto Expo 2023

Hyundai ने आपली इलेक्ट्रिक कार IONIQ5 ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केली. कंपनीने पहिल्या 500 ग्राहकांसाठी Ioniq 5 क्रॉसओवरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 44.95 लाख रुपये ठेवली आहे. Hyundai Ioniq 5 एका पूर्ण चार्जमध्ये 631 किमी पर्यंत प्रवास करू शकते. 

3/6

Auto Expo 2023

चीनच्या कार कंपनी BYD बुधवारी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक सेडान कार BYD SEAL सादर केली. ही कार या वर्षाच्या अखेरीस बाजारात येऊ शकते. पूर्ण चार्ज केल्यास ही गाडी 700 किलोमीटर चालेल. यासोबतच कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार BYD ATTO 3 चे स्पेशल एडिशन देखील लॉन्च केले आहे.

4/6

Auto Expo 2023

Kia Motors ने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये इलेक्ट्रिक कारमध्ये आपला दबदबा असल्याचा दाखवला. कंपनीने कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार EV9 प्रदर्शित केली.

5/6

Auto Expo 2023

MG मोटरने ऑटो एक्स्पोमध्ये आपली इलेक्ट्रिक कार MG4 देखील प्रदर्शित केली. ही इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. कारच्या केबिनच्या आत दोन फ्लोटिंग स्क्रीन मिळतात. MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

6/6

Auto Expo 2023

JBM ऑटोने बुधवारी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपला पहिला सेल्फ-डिझाइन आणि सेल्फ-निर्मित इलेक्ट्रिक लक्झरी कोच 'Galaxy' लाँच केला. . (Photo credit: IANS)