काय सांगता... 4 लाखांहून कमी किमतीत मिळतेय 34 किमीचं मायलेज देणारी कार?

Auto News : स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतो. हक्काची कार म्हणजे हवं तिथं, हवं तेव्हा जाण्याचं स्वातंत्र्य. 

Jun 24, 2024, 13:27 PM IST

Auto News : कुटुंब लहान आहे, पगारही फारसा नाही? आता कार खरेदीसाठी बजेटचा आकडा कधीच अडचणी निर्माण करणार नाही... पाहा मोठी बातमी... 

1/7

स्वप्नपूर्ती

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

Auto News : कार खरेदीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं तुम्हीही प्रयत्न करत आहात का? मोठी नव्हे, पण किमान एखादी लहानशी कार तुम्हालाही हवीय का? 

2/7

कमी बजेट

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

Auto News : इथं कमी बजेट तुमची अडचण नसणारे..... कारण, अवघ्या 3.99 लाख रुपयांनाही कार खरेदी करता येणार आहे. त्यामुळं बजेटची चिंता सोडून आता कोणती कार खरेदी करायची याचा विचार करा.  

3/7

मारुती वॅगन आर

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

दोन पेट्रोल इंजिनच्या पर्यायासह उपलब्ध असणारी मारुती वॅगन आर, ही कार 5.54 लाख रुपयांना उपलब्ध आहे. 1 लीटर आणि 1.2 लीटक अशा दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असून, या कारचं पेट्रोल वेरिएंट 24 किमी आणि सीएनजी वेरिएंट 34 किमी इतकं मायलेज देतं.   

4/7

मारुती सेलेरियो

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

5.37 लाख रुपये इतकी किंमत असणाऱ्या मारुती सेलेरियो कारमध्ये 1 लीटर पेट्रोलचं इंजिन देण्यात आलं असून, कारचं पेट्रोल वेरिएंट 25 किमी आणि सीएनजी वेरिएंट 34 किमी इतकं मायलेज देतं.   

5/7

रेनॉ क्विड

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

4 लाख 70 हजार रुपये इतकी किंमत असणाऱ्या रेनॉ क्विड कारमध्ये 1 लीटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून, ही कार फक्त पेट्रोल इंजिन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ही कार 20 किमी इतकं मायलेज देते.   

6/7

मारुती एसप्रेसो

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

एसयुव्ही लूकसाठी ओळखली जाणारी मारुती एसप्रेसो 1 लीटरच्या क्षमतेमध्ये उपलब्ध असून, कारचं पेट्रोल वेरिएंट 24 किमी, तर सीएनजी वेरिएंट 34 किमी इतकं मायलेज देतं.   

7/7

मारुती अल्टो के 10

Auto news cheapest hatchback car under 4 lakh price car options

मारुती अल्टो देशातील सर्वाधिक स्वस्त कार असून, या कारचं इंजिन 1 लीटर इतक्या क्षमतेचं असून, पेट्रोल वेरिएंटमध्ये कार 24 किमी आणि सीएनजी वेरिएंटमध्ये 33 किमी इतकं मायलेज देते.