मारुतीच्या 'ह्या' कार्स वर तब्बल 59000 रु ची सूट; हिशोब सांभाळून हक्काच्या वाहनाचं स्वप्न होणार साकार

Tata आणि Renault मागोमाग आता मारुतीनंसुद्धा त्यांच्या अरिना कारच्या मॉडेल्सवर मे महिन्यासाठी घसघसीश सवलती देऊ केल्या आहेत. जिथं तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. 

May 08, 2023, 21:48 PM IST

Maruti Cars Discount on May 2023: एक ना एक दिवस मी स्वत:ची कार घेणार... असं अनेकजण ठरवतात. पण, बऱ्याचदा पगाराचाच आकडा तितका मोठा नसल्यामुळं हे स्वप्न साकार होण्यासाठी लागणारा कालावधी काहीसा लांबतो. आता मात्र तसं होणार नाही. 

1/7

डिझायर

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

6.51 ते 9.39 लाख रुपयांच्या घरात असणाऱ्या डिझायर (Dzire) कारची खरेदी करताना तुम्हाला 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.   

2/7

स्विफ्ट

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

अनेकांच्याच आवडीच्या स्विफ्ट (Swift) कारवर तुम्ही 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट असे 54 हजार रुपये वाचवू शकाल.   

3/7

वॅगनर

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

5.54 ते 7.42 लाख रुपये इतक्या किमतीत विक्री होणाऱ्या Wagon R वर तुम्हाला 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट असे 54 हजार रुपये वाचवता येऊ शकतील.   

4/7

सेलेरिओ

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

तब्बल 5.37 ते 7.14 लाख रुपये इतक्या किंमतीत येणाऱ्या सेलेरिओ (Celerio) कारवर 35 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट अशी 54 हजार रुपयांची बचत करता येईल.   

5/7

एसप्रेसो

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

4.26 ते 6.12 लाख रुपये इतक्या दरात मिळणाऱ्या एसप्रेसो मॉडेलवर तुम्हाला 35 हजारांचा कॅश डिक्काऊंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4 हजारांचा कॉर्पोरेट बोनस मिळून एकूण 54 हजार रुपये वाचवता येणार आहेत.   

6/7

अल्टो 800

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

Alto 800 साधारण 3.54 ते 5.13 लाख रुपये इतक्या दरात येणाऱ्या या कारवर तुम्हाला 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे, त्यामुळं तुम्हीही या कारचा विचार करु शकता.   

7/7

अल्टो के 10

Auto news Save Up To Rs 59000 On Maruti Cars know details

अल्टो के 10 (Alto K10) वर तुम्हाला 40 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस असा एकूण 59 हजारांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.