Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

| Jan 22, 2024, 15:34 PM IST
1/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये आज म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. दुसरीकडे याच दिवशी आपली प्रसूती करावी अशी मागणी करणाऱ्या गर्भवती महिलांची संख्याही देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये लक्षणीय असल्याची बातमी नुकतीच समोर आली.

2/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

3/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

22 जानेवारी रोजी चंद्र वृश्चिक राशीत आहे. मंगळ, शुक्र आणि बुध धनू राशीतच आहेत. त्याचप्रमाणे सूर्य मकर आणि शनी कुंभ राशीत आहे. राहू मीन आणि गुरु मेष राशीत आहेत. 22 हा जन्म तारीख असलेल्या मुलांचा जन्मअंक 04 आणि भाग्यांकही 04 असेल. हा फार दुर्मिळ योग आहे असं सांगितलं जातं.

4/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

04 क्रमांकाचा स्वामी ग्रह राहु, शनी आहे. तसेच हा बुधचा मित्र अंक आहे. 04 जन्मांक व भाग्यांक असलेली मुलं फारच भाग्यवान असतात. आज जन्मणारी मुलं धर्माच्या क्षेत्रात फार मोठं काम करतात असं मानलं जातं.

5/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

आज म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी जन्मणारी मुलं फार विद्वान आणि प्रभावशाली असतील. अशी मुलं उत्तम नेते होऊ शकतात किंवा प्रशासनामध्ये मोठ्या पदावर विराजमान होऊ शकतात.

6/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

22 जानेवारीला चंद्र शुक्राच्या वृष राशीत आहे. शुक्र हा ग्रह चित्रपट, ग्लॅमरच्या जगावर वर्चस्व असलेला मानला जातो. शनी हा न्यायाचा ग्रह असून त्याला विधीसंदर्भात संपूर्ण कल्पना असते. मंगळ आणि सूर्य आरोग्य आणि दिर्घायुष्य देणारे आहेत.

7/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

22 जानेवारी 2024 रोजी जन्मणाऱ्या मुलांच्या राशीतील सूर्य वडिलांना धनवान बनवणारे असेल तर चंद्र वृश्चिकचा असून या तारखेला जन्माला येणारी बाळं आईसाठीही फार भागव्यवान असतील.

8/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

बाळाच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत त्याच्या आई-वडिलांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. गाडी घेण्याची संधीही चालून येईल.

9/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

22 जानेवारी रोजी जन्माला येणारी मुलं कुशाग्र बुद्धीमत्तेची असतील. ही मुलं गणपतीची भक्ती करतील. भगवान श्री रामाचीही ते भक्ती करतील.

10/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

प्रभू रामांबरोबरच भगवान विष्णूचीही 22 जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलांवर विशेष कृपा असेल. ही मुलं धर्माच्या मार्गावर चालणारी आणि सत्य बोलणारी असतील.

11/11

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha know about baby born on 22 january 2024

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.