देव साकारणारा माणूस! रामल्लला साकारणाऱ्या MBA पास मूर्तीकाराचा प्रेरणदायी प्रवास

Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये विराजमान होणारी रामलल्लाची पहिली झलक शुक्रवारीच समोर आली. ही मूर्ती साकारणारी व्यक्ती सर्वसामान्य नाही. याच मूर्तीकारासंदर्भात जाणून घेऊयात...

Jan 22, 2024, 08:09 AM IST
1/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंबरोबरच एका मूर्तीकाराचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

2/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

या मूर्तीमुळे एमबीए पूर्ण केल्यानंतर शिल्पकलेमध्ये करिअर करणारा अरुण योगीराज सध्या भारतभरात चर्चेत आहे.

3/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अरुणने साकारलेली रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.  

4/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

शिल्पकलेमध्ये करिअर करण्याचा अरुणचा विचार नव्हता.

5/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अरुणच्या कुटुंबातील 5 पिढ्या शिल्पकलेमध्येच आहेत. 

6/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

एमबीएनंतर कॉर्परेट जॉब न करता अरुणने वडिलोपार्जित व्यवसाय असलेल्या शिल्पकलेमध्येच करिअर सुरु केलं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि अरुणचे आजोबा एका फोटोत दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अरुण आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत.

7/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अरुणने यापूर्वीही अनेक सुंदर पुतळे साकारलेत.

8/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

इंडिया गेटजवळ उभारलेला 30 फुटांचा सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अरुणने साकारलेल्या पुतळ्यांपैकीच एक.

9/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

खुद्द पंतप्रधान मोदींनाही अरुणने साकारलेला हा सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा फार भावला. त्यांनी सोशल मीडियावरुन अरुणचं कौतुकही केलं होतं.

10/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

केदारनाथमधील 12 फुटांचा आदी शंकराचार्याचे शिल्प अरुणनेच साकारले आहे.

11/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

मैसूरमधील 21 फुटी उंचीचे हनुमानाच्या शिल्पाबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचेही अनेक पुतळे अरुणने साकारलेत.

12/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

शेकडो मूर्ती साकारणाऱ्या अरुणच्या हातून अयोध्येतील राम मंदिरामधील प्रभू रामलल्लांची मूर्ती घडावी हे त्याच्या आईचं आणि पत्नीचं एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.

13/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अरुणचा देवावर फार विश्वास आहे. याचा त्याला मूर्ती साकारताना फार फादा होतो.

14/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

देवावर विश्वास असल्यामुळेच मूर्तीची घडवताना अरुण केवळ पूर्ण विश्वासाने काम करतो आणि त्याच्या हातून कलाकृती घडत जाते, असं तो स्वत: सांगतो.

15/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अनेक मोठमोठ्या मूर्ती साकारणाऱ्या अरुणसाठी प्रभू रामलल्लांची मूर्ती साकारणे हे काही सोपे काम नव्हते.

16/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

रामलल्लाच्या मूर्तीवरील हावभावांबरोबरच मूर्ती पाहता क्षणी मनातील भक्तीभाव जागा झाला पाहिजे इतकी ती रेखीव हवी होती आणि अरुणने तशीच मूर्ती साकारली. 

17/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

अरुणचा प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे.

18/18

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Statue Sculptor Arun Yogiraj

आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि आपण ती चिकाटीने करत असू तर त्यात आपल्याला यश मिळतं हे अरुणचा प्रवास पाहिल्यानंतर समजतं.