Ayodhya Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे 8 महत्त्वाचे शिलेदार

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येत राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश 'राममय' झाले आहेत. असं असताना श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ज्या 8 शिलेदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. 

| Jan 22, 2024, 08:00 AM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता अखेर तो मंगलमय क्षण आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर सावळ्या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून या क्षणाची अनुभूती आज संपूर्ण देश घेणार आहे. प्रभू श्रीरामाचे राम मंदिर जवळपास 25 हजार फुलांनी सजवलं आहे. अयोध्या नगरी लक्षावधी दिव्यांनी उजळली असून रंगीबेरंगी फुलांनी सजली आहे. असं असताना आज ज्या शिलेदारांमुळे श्रीरामजन्मभूमीवर हे मंदिर होत आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

1/8

महंत रामचंद्रदास परमहंस

Ayodhya Ram Mandir

महंत रामचंद्रदास परमहंस यांनी रामजन्मभूमीवर राम मंदिर निर्माण करण्याची दूरदृष्टी योजना आखली होती. सण 1947 पासून भारताच्या स्वातंत्र्य काळात महंत फैजाबादमध्ये हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष होते. 1949 पासून 1992 मध्ये बाबरी पडेपर्यंत मुख्य भूमिकेत महंत रामचंद्रदास परमहंस मुख्य भूमिकेत राहिले. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते प्रभू श्रीराम मंदिरासाठी संघर्ष करत राहिले. 

2/8

अशोक सिंघल

Ayodhya Ram Mandir

श्रीराम मंदिर आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंहल यांनी मध्यमवर्ती भूमिका पार पाडली. अशोक सिंघल यांच्या नेतृत्वामुळे आंदोलनाला धार आली. 

3/8

देवराहा बाबा

Ayodhya Ram Mandir

बाबरी मंदिराच्या विरोधात जे आंदोलन झाले त्यामध्ये देवराहा बाबा हे आघाडीवर होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव यांनी यांनी देवराहा बाबा यांच्या आदेशानंतर वादग्रस्त ठिकाणाचे कुलूप उघडल्याचे बोलले जाते. 

4/8

महंत अवैद्यनाथ

Ayodhya Ram Mandir

आंदोलनात श्रीरामजन्मभूमी यज्ञ समितीचे पहिले अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचीही मोठी भूमिका राहिली आहे. मंदिर निर्माणासाठी रामजन्मभूमी न्यासाचे ते अध्यक्षही होते.  या सगळ्या शिलेदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि आज त्या देवदुर्लभ क्षणाची अनुभूती आपण सगळे घेणार आहोत. 

5/8

लालकृष्ण अडवाणी

Ayodhya Ram Mandir

अयोध्या रामजन्मभूमी मोहिमेला राजकारणाचा प्रमुख केंद्रीय मुद्दा बनवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 1990 मध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदिर ते अयोध्येतील रामजन्मभूमीपर्यंत देशव्यापी रोड शो सुरू केला.  

6/8

मुरली मनोहर जोशी

Ayodhya Ram Mandir

मुरली मनोहर जोशी हे राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मुरली मनोहर जोशी अडवाणींसोबत होते. बाबरी मशीद पडल्यानंतर उमा भारतींना मिठी मारताना जोशींच्या छायाचित्राने त्यावेळी देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

7/8

उमा भारती

Ayodhya Ram Mandir

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भाजप नेत्या आणि मंत्री राहिलेल्या उमा भारती या राम मंदिर आंदोलनातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्या होत्या. बाबरी मशीद पाडण्याच्या भूमिकेबद्दल लिबरहान आयोगाने त्याला जमावाला चिथावणी दिल्याबद्दल दोषी ठरवले होते. प्रभू राम हे कोणा एका पक्षाची संपत्ती नाही, राम सर्वांचा आहे, असे उमा भारती नेहमीच सांगत असतात.

8/8

कल्याण सिंह

Ayodhya Ram Mandir

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंह हे अयोध्या मोहिमेचे प्रादेशिक नायक होते. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर होते. त्यांनी वादग्रस्त रचनेकडे जाणाऱ्या कारसेवकांवर बळाचा वापर न करण्याचे आदेश दिले होते.