टीव्ही अभिनेत्रीने फक्त वयाच्या 21 व्या वर्षी मुंबईत घेतलं स्वत:चं घर, पाहा लक्झरी अपार्टमेंटचे PHOTOS

टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेनने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं असून, आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावरुन तिने नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत.  

Feb 11, 2024, 17:38 PM IST
1/9

'बालवीर' या कार्यक्रमातील 'मेहेर' या भूमिकेने प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री अनुष्का सेनने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.   

2/9

अनुष्का सेनने वयाच्या 21 व्या वर्षीय मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे.   

3/9

अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.   

4/9

'आमचं नवं घर, सेन कुटुंब. आणखी एक स्वप्न पूर्ण झालं', अशी कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.   

5/9

अनुष्काने पोस्टमध्ये घराचे फोटोही शेअर केले आहेत. यामधून ते किती लक्झरी तसंच सुविधापूर्ण आहे हे दिसत आहे.   

6/9

अनुष्काचं हे घर उंच इमारतीतील वरच्या मजल्यावर असल्याने त्यातून मुंबई अत्यंत सुंदर दिसत आहे.   

7/9

अनुष्काच्या फोटोत तिचे आई-वडिलही दिसत आहेत.   

8/9

अनुष्काच्या या फोटोंवर तिचे चाहतेही कमेंट करत आहेत. इतक्या छोट्या वयात मोठं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.   

9/9

अनुष्का सेनने 2009 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. झी टीव्हीवरील 'यहाँ में घर घर खेली' या मालिकेतून तिने पदार्पण केलं. 'बालवीर' या टीव्ही मालिकेतील मेहेर या पात्राच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 2015 मध्ये, अनुष्काने क्रेझी कुक्कड फॅमिली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.