काय सांगता! एक लीटर दूधाची किंमत 5.50 हजार, गाढविणीचं दूध विकून कमवतोय लाखो रुपये
May 01, 2023, 17:06 PM IST
1/7
तामिळनाडूतील बाबू उलगनाथन या शेतकऱ्याने गाढविणीचे दूध विकून लाखो रुपये कमावले आहेत. गाढविणीच्या दुधाच्या विक्रीतून बाबू उलगनाथन यांनी मोठी उलाधाढ केली आहे. (फोटो - PIXABAY)
2/7
2022 मध्ये, बाबू उलगनाथन भारतातील सर्वात मोठे गाढवांचे फार्म असलेल्या The Donkey Palace ची स्थापना केली होती. बाबू उलगनाथन यांच्या टीमने आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन हॉर्स येथे उद्योजकता विकास कार्यक्रमात भाग घेतला होता. (फोटो - PIXABAY)
TRENDING NOW
photos
3/7
यावेळी त्यांनी गाढवांच्या शेतीचा अभ्यास केला आणि माहिती घेतली. ICAR-NRCE ने बाबू उलगनाथन यांना गाढवाचे फार्म The Donkey Palace ची स्थापना करण्याचे सुचवले. (फोटो - PIXABAY)
4/7
तामिळनाडूत गाढवांची संख्या फारशी नाही. तसेच दूध देणाऱ्या गाढविणीही सहा महिन्यात एक लिटरपेक्षा कमी दूध देत होत्या. त्यामुळे बाबू उलगनाथन यांनी या व्यवसायत उतरण्याचे ठरवले.
5/7
बाबू उलगनाथन आपल्या The Donkey Palace मध्ये तब्बल 5000 गाढवे पाळण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी 75 हून अधिक फ्रँचायझी फर्मसोबत करार केले. यासाठी त्यांनी The Donkey Palace One Health One Solution हे एक संवर्धन, मनोरंजन आणि जागरूकता केंद्र देखील स्थापन केले आहे.
6/7
त्यानंतर बाबू उलगनाथन यांनी 5,550 रुपये प्रति लिटर इतक्या दराने गाढविणीच्या दुधाची विक्री सुरु केली आहे. त्यांचा हा व्यवसाय अमेरिका, युरोप, चीनसह इतर देशांशी जोडला गेला आहे. गाढवाच्या दुधाशिवाय गाढवाच्या दुधाची पावडर, गाढवाच्या दुधाचे तूपही बनवले जाते.
7/7
इतक्या महागात विकल्या जाणाऱ्या या दुधाला लिक्विड गोल्ड असेही म्हटलं जाते. गाढविणीचे दूधाचा चांगल्या त्वचेसाठी तसेच अनेक रोगांशी लढण्यासाठीही उपयोग केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे हे दूध लवकर खराब होत नाही. ते अनेक दिवस तसेच राहते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link