Baby Ariha Shah! 7 वर्षांची चिमुकली 22 महिने अकडली जर्मनीत, आई वडिलांकडून हिसकवल्यानंतर...

Viral News : एक आई आपल्या लहान मुलीला दूरच्या देशातून परत मिळवण्यासाठी युद्ध लढतंय. अहिरा शाह जमतेम 7 महिन्यांची चिमुकलीला तिच्या आई वडिलांकडून हिसकावून घेतलं. कारण म्हणे तिच्या आई मुलीवर अत्याचार करते. पण हे आरोप खोटे ठरले तरीदेखील जर्मनी सरकारने तिला परत केलं नाही. आता भारत सरकारने तिला परत आणण्यासाठी लढाई सुरु केली आहे. 

Aug 04, 2023, 16:56 PM IST

Trending news : तुम्हाला अभिनेत्री राणी मुखर्जीचा Mrs Chatterjee Vs Norway हा चित्रपट आठवतो. ज्यामध्ये राणी मुखर्जी आपल्या मुलांसोबत वाईट वागते असा आरोप करून नोर्वे सरकार त्याच्या दोन मुलांना तिच्यापासून हिसकावून घेतात. त्यातील लहान मुलगी जमतेम काही महिन्यांची दाखविण्यात आली आहे. 

 

1/16

या चित्रपटाची आठवण झाली कारण असं एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये 22 महिन्यांपासून जर्मनीत अरिहा शाह ही 7 वर्षांची चिमुकली अडकलेली आहे. 

2/16

या मुलाला परत आणण्यासाठी आईच्या संघर्षात आता भारत सरकारने पुढाकार घेतला आहे. जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन यांना बोलावून मुलगी लवकरात लवकर परत करण्याची विनंती करणार आहेत. 

3/16

झालं असं की, जर्मनी सरकारकडून मुलीच्या पालकांवर क्रूरतेचा आरोप करत त्या चिमुकलीला त्यांनी बर्लिनमधील फॉस्टर केअर सेंटरमध्ये ठेवलं आहे.   

4/16

पालकांनी लढा देत त्यांच्यावरील लावण्यात आलेले आरोप खोटे आणि निष्पन्न ठरवले आहेत. त्यानंतरही अजून त्यांचा चिमुकलीला त्यांनी परत केले नाही, असं आई वडिलांचं म्हणं आहे. 

5/16

ही घटना 23 सप्टेंबर 2021 ची आहे. अरिहा शाह अवघी सात वर्षांची तान्हुली असताना तिला अपघाती दुखापत झाली. त्यानंतर आई धारा शाह हिने तिला डॉक्टरांकडे नेलं.

6/16

त्यावेळी डॉक्टरांनी बाल संगोपन सेवेला बोलावून चिमुकलीला त्यांचा स्वाधीन केलं. आज अहिरा 29 महिन्यांची आहे आणि ती 22 महिन्यांपासून जर्मनीच्या युवा कल्याण कार्यालयाच्या ताब्यात आहे. 

7/16

भारताचा असा विश्वास आहे की, मुलीचं संगोपन तिच्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात होणं महत्त्वाचं आहे.

8/16

मुलीला जर्मन पालनपोषणात ठेवणं तिच्या सांस्कृतिक अधिकारांचं आणि भारतीय म्हणून तिच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांचं म्हणं आहे.   

9/16

अहमदाबादचे रहिवासी भावेश शाह आणि धारा हे वर्क व्हिसावर जर्मनीतील बर्लिनमध्ये गेले होते. तिथे अरिहाच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.   

10/16

पालकांवर तिच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केलं. सप्टेंबर 2021 पासून हे कुटुंब अरिहाच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. 

11/16

अरिहाची आई धारा हिचं म्हणं आहे की, या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अरिहाला पालनपोषण गृहात दोन वर्ष होतील. 

12/16

धक्कादायक म्हणजे जर्मन सरकारच्या नियमांनुसार जर एखादे मूल दोन वर्षांपासून पालनपोषण गृहात राहत असेल तर ते मूल पालकांना परत दिलं जातं नाही. त्यामुळे तिला भारतात आणण्यासाठी लढाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे. 

13/16

अरिहाची आई धाराने त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं. ती म्हणाली की, ज्यादिवशी तिला लागलं तेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि सर्व काही ठीक आहे असं सांगितलं. पण त्यानंतर आम्ही फॉलोअपसाठी गेलो तेव्हा तिला आमच्याकडून हिसकावून घेतलं. 

14/16

हॉस्पिलटने चाइल्ड केअरला डिसेंबर 2021 ला अहवाल सादर केला. या अहवालानुसार त्यांवरील लैंगिक शोषणाला नकार दिला होता. मुलीचे वडील आणि आजोबांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये पोलिसांनी हे प्रकरण बंद केलं.   

15/16

गैरसमजातून हे प्रकरण सुरु झाले होते. अहवालानंतर सगळे गैरसमज दूर झाले होते आम्हाला वाटलं आता आमचं लेकरु परत मिळणार पण आजही आम्ही तिची वाट पाहत आहोत. 

16/16

पण त्यांनी नवीन वाद सुरु केला की अरिहा अटॅचमेंट डिसऑर्डरची शिकार आहे. त्यामुळे तिला पैरेंट्स चाइल्ड फैसिलिटीमध्येत ठेवण्यात यावे. मात्र जर्मन चिल्ड्रन सर्व्हिसने आता त्या मुलीला मतिमंद मुलांसोबत ठेवलं आहे.