Captain Injured: बांग्लादेश-भारत सामन्यापूर्वी वाईट बातमी; दुखापतीमुळे कर्णधाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Captain Injured: वर्ल्ड कप 2023 चा 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्स राखून विजय मिळवत वर्ल्डकप 2023 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली.

Oct 16, 2023, 12:31 PM IST
1/5

या सामन्यात गोलंदाजांनंतर रोहित शर्माच्या स्फोटक खेळीने पाकिस्तानचा पराभव झाला. अशातच बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी कर्णधाराच्या उपस्थितीतवर सस्पेंस निर्माण झाला आहे.

2/5

गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध बांगलादेश सामना रंगणार आहे. अशावेळी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनच्या खेळावर सस्पेंस निर्माण झाला आहे.

3/5

शकिब अल हसनच्या डाव्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखापत झाली असून त्यामुळे भारताविरुद्धचा आगामी सामना खेळण्याबाबत सस्पेंस आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात त्याला दुखापत झाली होती.

4/5

न्यूझीलंड सामन्यादरम्यान शाकिबला दुखापत स्पष्ट झाली. त्यामुळे त्याला फलंदाजी करतानाही अडचणींचा सामना करावा लागला होता. याशिवाय गोलंदाजी पूर्ण झाल्यानंतर, त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

5/5

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शाकिबच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. त्याची अनुपस्थिती बांगलादेशाच्या टीमसाठी मोठा धक्का असणार आहे.