OLA, Ather ला विसरा! Chetak ची इलेक्ट्रिक स्कूटर नव्या अवतारात लाँच, 136 किमीची रेंज अन् दमदार फिचर्स

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने बजज ऑटोने घरगुती बाजारपेठेत आपली एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतकचं नवं स्पेशल एडिशन लाँच केलं आहे.   

| Aug 06, 2024, 17:55 PM IST

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने बजज ऑटोने घरगुती बाजारपेठेत आपली एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतकचं नवं स्पेशल एडिशन लाँच केलं आहे. 

1/9

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने बजज ऑटोने घरगुती बाजारपेठेत आपली एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतकचं नवं स्पेशल एडिशन लाँच केलं आहे.   

2/9

कंपनीने या स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटरला 'Chetak 3201' असं नाव दिलं आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत जे तिला रेग्युलर मॉडेलपेक्षा वेगळं करतात.  

3/9

नव्या 'Chetak 3201' ची किंमत 1,28,744 (एक्स शोरुम) पासून सुरु होते. या स्कूटरमध्ये कंपनीने इम्बोज्ड डिकेल्स आणि क्विल्टेड सीट दिली आहे, जे तिला प्रिमियम बनवतात.  

4/9

ही स्कूटर थेट Amazon वर एक्स्क्लुझिव्ह लाँच करण्यात आलं आहे. बजाज एकमेव स्कूटर आहे जी या सेगमेंटमध्ये मेटल बॉडीसह येते.   

5/9

कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी IP67 रेटसह येते. म्हणजेच बॅटरी धूळ, ऊन आणि पाण्यापासून पूर्ण सुरक्षित आहे.   

6/9

बजाज चेतकचं हे नवं स्पेशल एडिशन सिंगल चार्जमध्ये 136 किमीची ड्रायव्हिंग रेंज देतं. यामध्ये काही अॅडव्हान्स फिचर्सही देण्यात आले आहेत.   

7/9

या स्कूटरमध्ये ब्लूट्यूथ कनेक्टिव्हिटी, चेतक मोबाईल अॅप सपोर्ट, कलर TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ऑटो हजार्ड लाईट असे फिचर्स मिळतात.   

8/9

ताशी 73 किमी टॉप स्पीड असणाऱ्या या स्कूटरची बॅटरी फूल चार्ज करण्यासाठी 5.30 तासांचा वेळ लागतो.   

9/9

जुलैमध्ये बजाज चेतकला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, फक्त एका महिन्यात स्कूटरच्या 20 हजार युनिट्सची विक्री झाली आहे.