मोत्यासारखं अक्षर हवंय? पालकांनी मुलांना असा करायला लावा सुंदर हस्ताक्षरासाठी सराव

मुलं शाळेत जायला लागली की, त्यांचं हस्ताक्षर सुधारणं ही पालकांची मोठी जबाबदारी असते. अशावेळी अगदी सोप्या ट्रिक्सने आठवड्याभरात मोत्यासारखं होईल अक्षरं.

| Aug 06, 2024, 17:40 PM IST

लहानांपासून मोठ्यांपर्यंत हस्ताक्षर खराब होण्याची समस्या असते. पटकन लिहिण्याच्या सवयीमुळे किंवा चुकीच्या पकडीमुळे खराब हस्ताक्षरामुळे अनेकदा लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. 

 

1/8

पालकांना असते चिंता

अनेक पालक आपल्या मुलांच्या खराब हस्ताक्षरामुळे चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत लहान मुलांचे तसेच मोठ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. ज्याच्या मदतीने ते सुधारले तर ते सुंदर मोत्यासारखे बनवता येऊ शकते.

2/8

अशी असावी शरीराची ठेवण

 अनेकदा लहान मुलं सुरुवातीपासूनच अभ्यासाला किंवा लिखाण करायला चुकीच्या पद्धतीने बसतात. शरीराची ठेवण महत्त्वाची असते. तुम्ही कसे बसता यावर तुमचं हस्ताक्षर अवलंबून असते. लिहिताना कोपर आणि मनगट हलले पाहिजेत, खांदे नव्हे.

3/8

बोटांनी लिहिण्याचा असा करा सराव

मुलांच्या बोटांना अगदी सुरुवातीपासूनच सरावाची सवय लावावी. त्यामुळे वाळू किंवा तांदूळ यांच्यामध्ये मुलांना लिहिण्याचा सराव करायला लावावा. यामुळे सुंदर हस्ताक्षर होण्यास मदत होईल. बोट अतिशय मोकळी होतात. 

4/8

पेन किंवा पेन्सिल कधीही घट्ट धरू नका

अनेक मुलं अगदी सुरुवातीलाच पेन्सिल किंवा पेन पकडताना अतिशय घट्ट पकडतात. पालकांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. कारण पेन आणि पेन्सिल घट्ट पकडल्याने हस्ताक्षर नीट, स्पष्ट येऊ शकत नाही. 

5/8

फक्त रेषा असलेल्या कागदावर लिहा

अनेकदा मुलं रेषा नसलेल्या वया किंवा मोकळ्या पाटीवर लिहायची सुरुवात करतात. अशावेळी मुलांच हस्ताक्षर खराब होऊ शकतं. त्यामुळे पाट्या किंवा वह्या अशा निवडा ज्यावर तीन ओळीच्या रेषा असतील. मुलांना सरावासाठी सुरुवातीला तीन ओळीच्या वह्यांची निवड करणे हा योग्य निर्णय ठरु शकतो. 

6/8

वेगवेगळ्या अक्षरांचा सराव करा

मुलांना जर मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा सगळ्या भाषा येत असतील तर मुलांना या तिन्ही भाषांचा सराव करायला शिकवा. कारण प्रत्येक भाषेचं वळण वेगळं आहे. यामुळे मुलांचं अक्षर सुधारायला नक्कीच मदत होते. 

7/8

लेखनाचा वेग कमी करा

अनेकदा मुलं खूप पटापट लिहितात. याला अभ्यास लवकर संपावा असं कारण असू शकतं किंवा कंटाळा हे एक कारण असू शकतं. पण अशा पद्धतीने लिखाण केल्यामुळे अक्षर अतिशय घाणेरडं येतं. लेखनाचा वेग कमी केल्यावर अक्षर मोत्यासारखं होतं. 

8/8

कॅलिग्राफी पेनने सराव करा

हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी पेन अतिशय महत्त्वाचा ठरतो. अशावेळी तुम्ही या पेनचा वापर करु शकता. कॅलिग्राफी पेन वापरण्याची सवय लहान मुलांना कमी वयात लावल्यामुळे त्यांचं अक्षर लहानपणापासूनच चांगल होतं.