आजपासून वाढणार तुमचा EMI, 'या' चार बँकांनी कर्जावरील व्याजदरात केली वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने काल म्हणजेच गुरुवारी धोरणात्मक दरांबाबत निर्णय दिला होता. त्यानंतर लगेचच बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत.

Aug 12, 2023, 16:53 PM IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने काल म्हणजेच गुरुवारी धोरणात्मक दरांबाबत निर्णय दिला होता. त्यानंतर लगेचच बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत.

1/7

आरबीआयकडून व्याजदर स्थिर

RBI keeps interest rates steady

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी पतधोरण आढावा बैठकीत धोरणात्मक व्याजदरात (रेपो दर) बदल केला नाही. आरबीआयने तो 6.5 टक्के कायम ठेवला आहे.

2/7

कोणत्या बॅंकांनी केली व्याजदरात वाढ

Bank news

चार प्रमुख बँकांनी गृहकर्जासह अन्य कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा (बीओबी), कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करूर वैश्य बँक यांचा समावेश आहे.

3/7

व्याजदरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ

interest rate hike

बँक ऑफ बडोदा (BoB) आणि कॅनरा बँकेसह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी निधी आधारित (MCLR) कर्ज दरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

4/7

बॅंक ऑफ बडोदा

bank of baroda

बँक ऑफ बडोदाने, एक वर्षाचा एमसीएलआर 8.70 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, पूर्वी हा दर 8.65 टक्के होता.

5/7

कॅनरा बँकने वाढवले दर

canara bank

कॅनरा बँकेनेही एमसीएलआर 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यात आता 8.70 टक्के वाढ झाली आहे. नवीन दर 12 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

6/7

बँक ऑफ महाराष्ट्र

bank of maharashtra

सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एक बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी वाढवला आहे. एका वर्षाचा एमसीएलआर 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्के झाला आहे.

7/7

करूर वैश्य बँक

karur vysya bank

खाजगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने कर्जाचा दर 0.15 टक्क्यांनी वाढवून 7.75 टक्के केला आहे. सुधारित दर 14 ऑगस्टपासून लागू होतील. (सर्व फोटो - PTI)