प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या 'या' दुर्लभ आजारामुळे निकामी, लक्षणे जाणून घ्या

Premanand Maharaj Kideny: महाराजांच्या चाहत्यांची संख्याही करोडोंच्या घरात आहे. प्रेमानंद महाराजांचा सत्संग ऐकण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटर विराट कोहली ते गायक बिप्राक देखील आला होता. बाबांची दिनचर्याच नाही तर त्यांची जीवनशैली आणि आजारपणाची देखील चर्चा असते. 

| Aug 12, 2023, 16:07 PM IST

Premanand Maharaj: वृंदावनातून जगभर प्रसिद्ध झालेले प्रेमानंद महाराज हे त्यांच्या विचारांसाठी ओळखले जातात. पहाटे दोन वाजता तो परिक्रमेसाठी निघतात. यानंतर पहाटे साडेचार वाजल्यापासून भजन सत्संग सुरु करतात. प्रेमानंदजींचा सत्संग आणि विचार ऐकण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर खूप पाहायला मिळतात. 

1/8

प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या 'या' आजारामुळे निकामी, लक्षणे जाणून घ्या

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

Premanand Maharajs Both Kidney Failures: वृंदावनातून जगभर प्रसिद्ध झालेले प्रेमानंद महाराज हे त्यांच्या विचारांसाठी ओळखले जातात. पहाटे दोन वाजता तो परिक्रमेसाठी निघतात. यानंतर पहाटे साडेचार वाजल्यापासून भजन सत्संग सुरु करतात. प्रेमानंदजींचा सत्संग आणि विचार ऐकण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर खूप पाहायला मिळतात. 

2/8

सेलिब्रिटी भेटीला

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

महाराजांच्या चाहत्यांची संख्याही करोडोंच्या घरात आहे. प्रेमानंद महाराजांचा सत्संग ऐकण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटर विराट कोहली ते गायक बिप्राक देखील आला होता. बाबांची दिनचर्याच नाही तर त्यांची जीवनशैली आणि आजारपणाची देखील चर्चा असते. प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या निकामी असणं हे त्यामागच कारण आहे.

3/8

18 वर्षे किडनीशिवाय

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

त्यांना किडनीचा गंभीर आजार आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या लहान वयातच खराब झाल्या होत्या. जिथे सामान्य माणूस किडनीशिवाय वर्षभरही निरोगी राहू शकत नाही. तिथे प्रेमानंद जी महाराज गेली 18 वर्षे किडनीचा आजार घेऊन दैनंदिन काम स्वतः करतात. ते फक्त चार तासांची झोप घेतात.  (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

4/8

लोकांना उत्सुकता

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

वृंदावनात फिरुन ते निरोगी जीवन जगत आहे. अशा स्थितीत महाराजांना असा कोणता गंभीर आजार होता की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या? हे लोकांना जाणून घ्यायचे आहे.  

5/8

किडनीच्या आजाराशी झुंज

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

वास्तविक प्रेमानंद जी महाराजांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनीचा आजार होता. तज्ज्ञांच्या मते हा आजार अनुवांशिक आहे. हा रोग 30 ते 50 वर्षांच्या वयात प्रकट होतो. हा आजार किडनीच्या गंभीर आजारांपैकी एक आहे. हे पालकांकडून मुलांपर्यंत येते.   

6/8

किडनीचा आकार

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

या आजारात किडनीचा आकार वाढू लागतो. सिस्ट म्हणजे यात पाणी आणि गाठी तयार होतात. या गाठी हळूहळू वाढत जातात. त्यामुळे किडनी हळूहळू काम करणे बंद करते. त्यामुळे किडनी निकामी होते. किडनी पूर्णपणे काम करणे बंद करते. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला डायलिसिसवर ठेवावे लागते.

7/8

1000 पैकी फक्त 1 सदस्याला आजार

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी रोग 1000 सदस्यांपैकी फक्त एकामध्ये आढळतो. हे लहानपणापासून होत नाही. वाढत्या वयात ही समस्या उद्भवते. संपूर्ण लोकसंख्येमध्ये ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनीचे केवळ 5 टक्के रुग्ण आढळतात. या आजाराच्या रुग्णांचे जगणे खूप कठीण होते.

8/8

आजाराची लक्षणे

Premanand Maharajs Both Kidney Failures Symptoms and Remedies

ऑटोसोमल डॉमिनेंट पॉलीसिस्टिक किडनी रोगामध्ये, पाठीच्या आणि खालच्या ओटीपोटात वेदना सुरू होतात. यामध्ये यूटीआय, हात-पाय तसेच डोळ्यांना सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होण्यापासून ते पचनक्रियेमध्ये अडथळे येतात. रक्त कमी होऊ लागते. या आजारात त्वचेवरही परिणाम होतो, रंग बदलू लागतो. त्यामुळे त्वचा काळवंडणे, विनाकारण अशक्तपणा येणे, थकवा येण्याबरोबरच पाय दुखणे, वारंवार शौचास जाणे आदी समस्या येतात.