Bay Leaf : एक तमालपत्राची कमाल! मधुमेहापासून हृदयापर्यंत 'हा' ठरतो रामबाण उपाय

Bay Leaf Water Benefits :  किचनमधील मसाल्यांमधील तमालपत्र हे अनेक भाज्या आणि पुलावाची चव वाढते. नॉनव्हेज म्हटलं की चिकन, मटनच्या ग्रेव्हीमध्ये तमालपत्र तर हवंच...पण या तमालपत्राचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून तुम्ही नक्की अवाक् व्हाल. 

Jan 25, 2023, 15:09 PM IST

Bay Leaf Water Benefits  : किचनमधील अनेक मसाले हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे मसाले जेवण्याची चव तर वाढवताच सोबतच आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. आपल्यापैकी अनेक जणांना भाजी किंवा पुलावमध्ये तमालपत्र आलं तर चिडचिड होते. कशाला हवं ते तमालपत्र...पण हे तमालपत्र एक औषधी वनस्पती आहे. या एका पानामुळे पचन, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या अनेक समस्यांवर रामबाण आहे. तुम्ही कधी तमालपत्राचं पाणी घेतलं आहे का? आज आपण तमालपत्राचे पाणी कसं तयार करतात आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात...(Bay Leaf Water Benefits for Diabetes chest cough Cold heart Fatty liver marathi health news)

1/5

तमालपत्राचे पाणी कसं तयार करायचं?

Bay Leaf Water Benefits

यासाठी 2 कप पाणी घ्या आणि त्यात 5 तमालपत्र टाकून ते पाणी उकळवा. हे पाणी 1 कप होईपर्यंत उकळा. त्यानंतर यात थोडं मीठ मिसळून गरम चहासारखं या पाण्याचं सेवन करा.   

2/5

फॅटी लिव्हर (Fatty liver)

Bay Leaf Water Benefits

जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर तमालपत्राचं हे पाणी तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. या पाण्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते. हे पाणी प्यायल्यामुळे यकृत डिटॉक्स होतं आणि शरीरातील घाण लघवी वाटेबाहेर पडते. 

3/5

सर्दी, कफसाठी फायदेशीर (Cold and cough)

Bay Leaf Water Benefits

तमालपत्राचे सेवन केल्यामुळे श्वसनसंस्थेला फायदा होतो.  हिवाळ्यात तमालपत्राचे पाणी प्यायल्याने छातीत सर्दी, कफ धुरुन राहतं नाही. तो सैल होतो आणि शरीराबाहेर पडतो.   

4/5

हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं (Heart health)

Bay Leaf Water Benefits

तमालपत्र हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हृदयाच्या केशिकांच्या भिंती मजबूत होतात, एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. 

5/5

मधुमेह (Diabetes)

Bay Leaf Water Benefits

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही तमालपत्राचे पाणी रामबाण उपाय आहे. हे पाणी प्यायल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते. हे शरीरातील इंसुलिन वाढवून साखरेची वाढ रोखण्यास मदत करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)