Health: रोजच्या जेवणात किती मीठ असावं? कोणतं मीठ जास्त आरोग्यदायी? Heart च्या रुग्णांनी मीठ खावं का?

आपण जेव्हा मीठाचं सेवन करतो तेव्हा ते चवीनुसार घ्यावं असं सांगितलं जातं. पण अनेक लोकांना जेवणात जास्त मीठ लागतं. तर काही लोकांना मीठ अजिबातच आवडत नाही. त्यामुळे आज जाणून घेऊयात की, मीठाचं जास्त सेवन केल्याने नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच दिवसातून की मीठ खाल्लं पाहिजे, जास्त मीठ खाण्याची सवय असल्यास काय करावं हेदेखील समजून घ्या.   

Feb 02, 2023, 15:14 PM IST
1/5

द क्विंटच्या रिपोर्टनुसार, रोज किमान 2400 मिलिग्रॅमच्या आसपास म्हणजेत 5 ग्रॅम मीठाचं सेवन केलं पाहिजे. जास्त मीठ खाल्ल्यास ह्रदयाला धोके निर्माण होतात. तुमचा रक्तदाब (Blood Pressure) वाढू शकतो. पण याचा अर्थ मीठाचं सेवन केल्याने बीपीची समस्या निर्माण होतो असं नाही. (Image-Canva)  

2/5

WHO च्या एका रिपोर्टनुसार, भारतातील एक व्यक्ती दिवसाला किमान 11 ग्रॅम मीठाचं सेवन करतं. याचा अर्थ भारतीय जितकं मीठ खाल्लं पाहिजे (5 ग्रॅम) त्याच्या दुप्पट सेवन करतो. मीठाचं जास्त सेवन केल्याने रक्तात सोडियम निर्माण होतं. यामुळे आपल्या शरिरातील पेशींमधून पाणी निघतं, जे आपल्या पेशींसाठी धोकादायक असतं. खासकरुन आपल्या मेंदूच्या पेशांना धोका असतो. (Image-Canva)  

3/5

वारंवार लघवीला येणंही जास्त मीठ खाण्याचं लक्षण असू शकतं. याशिवाय जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास वारंवार पाणी पिण्याची इच्छा निर्माण होते. वारंवार गळा सुकल्यासारखं वाटतं आणि पाणी प्यायल्यानंतरही तहान मिटत नाही. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील वेगवेगळ्या भागात सूज येते. तसंच वारंवार डोकेदुखीची समस्याही जाणवते.   

4/5

जर तुम्ही जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केलं असेल आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो असं वाटत असेल तर लगेच खूप सारं पाणी प्या. पोटॅशिअमयुक्त पदार्थांचं सेवन करा. तसंच ताजं अन्न खावा. (Image: Canva)  

5/5

द क्विंटच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना हार्ट, किडनी आणि डायबेटिजचा त्रास आहे त्यांनी 1500 मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन केलं पाहिजे. सेंधा किंवा Pink Salt मध्ये पोटॅशिअमचं प्रमाण जास्त आणि सोडियम कमी असतं. हार्ट, किडनी, उच्च रक्तदाब आणि डायबेटिजच्या रुग्णांसाठी सफेदच्या तुलनेत हे मीठ उत्तम आहे.