चंदू चॅम्पियनसाठी कार्तिकला सोडावे लागले आवडीचे पदार्थ, 'असं' होतं डाएट

अभिनेता कार्तिक आर्यनचा नुकताच नवा सिनेमा चाहत्यांचा भेटीला आला आहे. चंदू चॅम्पियन या सिनेमातील कार्तिकच्या नव्या लुकला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली.

Jun 13, 2024, 14:54 PM IST

या सिनेमातील भूमिकेसाठी त्याने  फिटनेसवर खूप मेहनत घेतली. 

 

1/9

एका मुलाखतीत कार्तिक म्हणाला की, चंदू चॅम्पियन सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यनने पॅरालिंपिक गोल्ड मेडालिस्ट मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. 

2/9

त्यासाठी त्याने स्विमिंग आणि बॉक्सिंगचं ट्रेनिंग देखील घेतलं. त्याशिवाय त्याने फिटनेस आणि डाएटवर देखील विशेष लक्ष दिलं. कार्तिक म्हणतो की,या सिनेमातील लुककडे खास लक्ष देण्यात आलं होतं. 

3/9

कार्तिकचं ट्रान्सफॉर्मेशन तितकं सोपं नव्हतं. सिनेमातील कार्तिकच्या लुकने सर्वांच्या नजरा वेधून घेतलं. 

4/9

सिनेमाच्या मुलाखतीत कार्तिक म्हणाला की, मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेसाठी वजनाकडे विशेष लक्ष्य दिलं. तो म्हणाला की, त्याने गोड पदार्थ आणि साखर खाणं सोडून दिलं. 

5/9

त्यामुळे त्याला गोड खाण्यापासून स्वत:ला लांब ठेवावे लागले. शाकाहारी खाण्यातून त्याने प्रोटीन वाढण्यावर भर दिला. 

6/9

कार्तिकने सांगितलं की, त्याला गोड पदार्थ खाण्याची सवय असल्याने त्याच्या साठी हे कठीण होतं. कार्तिक शाकाहारी असल्याने त्याने न्युट्रिशिअन्सकडून डाएटसाठी योग्य सल्ला घेतला होता.   

7/9

कार्तिक म्हणाला की, अ‍ॅथलीट चॅम्पियनसारखी बॉडी बनवणं हे माझ्यासाठी खूप  कठीण होतं.   

8/9

या दरम्यान कार्तिक रात्री सलग आठ झोप घेत होता.बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन सिनेमा 14 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

9/9

या सिनेमामध्ये  कार्तिकसोबत श्रद्धा कपूर देखील झळकणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले असून श्रद्धा आणि कार्तिक यांची पडद्यावरील केमिस्ट्री अनुभवता येणार आहे.