Hotstar वरच्या या गाजलेल्या Web Series तुम्ही पाहिल्यात का?

सर्वात लोकप्रिय ओटीटी चॅनेल म्हटलं तर हॉटस्टार हे नाव टॉपमध्ये असतंच. 

Jul 07, 2022, 17:32 PM IST

मुंबई : हॉटस्टार हे एकापेक्षा एक वेब सीरिजने भरगच्च भरलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रेमापासून ते सस्पेंस, सेक्स, क्राइम कॉमेडीपर्यंत सर्व काही मिळतं.

 

1/6

Human

Human : ह्यूमन ही वेब सीरीज ही वैद्यकीय जगताचं वास्तव दाखवणारी एक सीरीज आहे, जी समाजातल्या अत्यंत सुसंस्कृत भागाची धोकादायक विचारसरणी बद्दल भाष्य करते. या मालिकेत शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारीसारखे मोठे स्टार्स आहेत ज्यांनी जबरदस्त कथा आणि दमदार अभिनयाने सीरीजला जीवदान दिलं आहे. (फोटो - सोशल मीडिया)

2/6

Special Ops

Special Ops : जर तुम्हाला क्राईम, अॅक्शन ड्रामाने भरलेला मिरची मसाला पाहण्याची आवड असेल, तर स्पेशल ऑप्समध्ये येऊन तुमची प्रतीक्षा नक्कीच संपेल, ही सीरीज हॉटस्टारच्या टॉप सीरिजमध्ये समाविष्ट आहे. (फोटो - सोशल मीडिया)

3/6

Aarya

Aarya : सुष्मिता सेनने केवळ या सीरीजद्वारे तब्बल दहा वर्षांनी अभिनयात पुनरागमन केलं तर आहेच पण ओटीटीच्या जगात देखील प्रवेश केला. या सीरीजचे दोन सीझन रिलीज झाले असून दोन्ही सीझन जबरदस्त होते. आता लवकरच तिचा तिसरा सीझन ही कथा पुढे नेणार आहे. (फोटो - सोशल मीडिया)

4/6

City of Dreams

City of Dreams : जर तुम्हाला राजकीय नाटकावर आधारित कथांची आवड असेल तर तुम्ही ही सीरीज जरूर पाहा. ही सीरीज अप्रतिम आहे ज्यात अतुल कुलकर्णीने अप्रतिम भूमिका साकारली आहे. (फोटो - सोशल मीडिया)

5/6

Criminal Justice

Criminal Justice : जर तुम्हाला क्राईम ड्रामा मालिका बघायला आवडत असेल तर तुम्ही क्रिमिनल जस्टिस पाहू शकता. या सीरीजचे दोन सीझनही आले असून दोन्ही सीझनमध्ये पंकज त्रिपाठी चांगल्या भूमिकेत दिसत आहे. जर तुम्ही पंकज त्रिपाठीचे चाहते असाल तर ही मालिका नक्कीच पाहा. (फोटो - सोशल मीडिया)

6/6

Out of Love

Out of Love : प्रेम, विश्वास आणि धोका... सगळं एकत्र बघायचं असेल, तर रसिका दुग्गलचा आउट ऑफ लव्ह पाहण्यासारखा आहे. रसिकाला OTT ची राणी असं म्हटलं जातं आणि ही मालिका रसिकाच्या सर्वोत्कृष्ट सीरीजपैकी एक आहे. (फोटो - सोशल मीडिया)