सफेद केसांना घरगुती पद्धतीने बनवा काळे

Apr 19, 2018, 11:07 AM IST
1/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

प्रत्येक स्त्रीला हे अगदी सिल्की आणि काळे केस हवे असतात. मात्र ज्यावेळी काळ्या रंगाच्या केसांचा बदल हा पांढऱ्या रंगाच्या केसात होतो. तेव्हा त्याचं दुःख जास्त असतं. यासाठी मग प्रत्येक जण उपाय शोधतात. कुणी डॉक्टरांचा सल्ला घेतो तर काही जण डाय लावतात. मात्र हा सगळा खटाटोप करण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय केलात तर त्याचा अधिक फायदा होईल.   

2/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

पेरूच्या पानांचा फायदा: पेरूच्या पानांचा फायदा देखील अधिक होत असतो. यामध्ये विटामिन बी आणि विटामीन सी सारखे गुण असतात. जे केसांसाठी अधिक चांगले असतात. विटामीन बी आणि विटामीन सी केसांसाठी महत्वाचे असतात. 

3/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

कडी पत्ता: कडी पत्ता फक्त खाण्याचा आस्वाद वाढवतात असं नाही तर ते केसांसाठी देखील अधिक फायदेशीर असतात. कडीपत्त्याची पाने नारळाच्या तेलात मिसळून जर केसांना लावले तर त्याचा फायदा अधिक होईल. हे तेळ रात्रभर ठेवल्याने केस काळे राहण्यास मदत होतात.  

4/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

नारळाचे तेल: नारळाच्या तेलात लिंबूता रस पिळा. त्यानंतर हे तेल केसाला लावा. यामुळे तुमचे केस काळे होतील आणि केसांना चांगली चमक देखील येईल. नारळाचे तेल केसांसाठी अधिक फायदेशीर असते.  

5/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

कांद्याचा रस: कांद्याच्या रसात सल्फर असते. जे केसांना काळ करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला 2,3 कांदे मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस डोक्याला लावायचा असतो. तसेच यामुळे तुमच्या डोक्यातील कोंडा देखील दूर होतो. तसेच केस गळती देखील थांबते.  

6/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

चहा पावडर : सफेद केसांना काळ करण्यासाठी चहाची पत्ती देखील अधिक गुणकारी आहे. चहा पावडर पाण्यात चांगल्याप्रकारे उकळा आणि या पाण्याने केसांना चांगल्याप्रकारे धुवा. याचा फरक फार उशीरा जाणवतो पण तो कायम टिकणारा असतो.  

7/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

आवळा: आवळ्याचे तुकडे करून ते नारळाच्या तेलात उकडायला ठेवा. तेव्हा पर्यंत उकडा जोपर्यंत त्याचा रंग काळा होत नाही. आणि त्यानंतर हे तेल डोक्यावर लावा. तसेच तुम्ही आवळ्याच्या पेस्टमध्ये लींबू पिळून त्याला देखील केसांवर लावा याचा भरपूर फायदा होईल. 

8/8

best natural remedies for reducing grey hair

best natural remedies for reducing grey hair

एलोवेरा जेल: एलोवेरा जेल हे चेहऱ्याप्रमाणेच केसांना देखील अधिक फायदेशीर आहे. केस धुण्याअगोदर एलोवेरा जेल लावावे, असे केल्यानंतर तुम्हाला केसांत चांगला फरक जाणवेल.