पॅराग्लायडिंगचा आनंद लुटण्यासाठी भारतातील बेस्ट ठिकाणे; एक आपल्या महाराष्ट्रात

भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. जेथे पर्यटकांना पर्यटनासह पॅराग्लायडिंगचा आनंद लुटता येतो.

Dec 02, 2023, 22:09 PM IST

Paragliding Destination In India: सध्या भारतात पर्यटनासह साहसी खेळांची क्रेज देखील वाढली आहे. अनेक साहसी खेळ खेळले जातात. पॅराग्लायडिंग हा दिवसेंदिवस लोकप्रिय होणारा साहसी खेळ आहे. पॅराग्लायडिंगचा आनंद लुटण्यासाठी भारतातील बेस्ट ठिकाणे जाणून घेवूया. यातील एक ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे. 

1/7

अनेकांच्या बकेट लिस्ट मध्ये पॅराग्लायडिंगचा अनुभव घेणे ही इच्छा असतेच. 

2/7

पाचगणी, महाराष्ट्र (Panchgani, Maharashtra) - महाराष्ट्रात पॅराग्लायडिंगसाठी अनेक ठिकाणे आहेत.  त्यापैकी पाचगणी हे देखील असेच एक ठिकाण आहे. एक सुंदर हिल स्टेशन आहे.   

3/7

कुंजापुरी, उत्तराखंड (Kunjapuri, Uttarakhand) – उत्तराखंडमधील कुंजापुरी हे पॅराग्लायडिंगसाठी  लोकप्रिय ठिकाण आहे.    

4/7

मसुरी, उत्तराखंड (Mussoorie, Uttarakhand) – डेहराडूनजवळ वसलेले मसुरी शहर पॅराग्लायडिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. 

5/7

नैनिताल, उत्तराखंड (Nainital, Uttarakhand) – नैनितालमधील नौकुचियातल आणि भीमताल ही पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

6/7

मनाली, हिमाचल प्रदेश (Manali, Himachal Pradesh) - पॅराग्लायडिंगसाठी मनाली हे भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. पॅराग्लायडिंगसाठी मनालीमधील सोलांग व्हॅली आणि मढी ही दोन प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

7/7

पक्षांप्रणामे आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पॅराग्लायडिंगमुळे शक्य होते.