महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉल

  अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि  सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.

Sep 04, 2024, 20:51 PM IST

Bhandardara Dam :  अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि  सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.

1/7

भंडारदरा धरणाचे नाव बदलण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. 

2/7

भंडारदरा धरण पुणे शहरापासून 156 किलोमीटर, तर मुंबईपासून 177 किलोमीटर अंतरावर आहे.  

3/7

भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील नेकलेस फॉल या धबधब्याचे प्रमुख आकर्षण आहे.  

4/7

भंडारदरा धरण परिसर महाराष्ट्राच्या पर्यटनाचे केंद्र आहे. प्रवरा नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. 

5/7

भंडारदरा धरण अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात असून या धरणाजवळच भंडारदरा नावाचे गाव आहे. या गावाच्या नावावरुनच या धरणाला भंडारदरा हे नाव देण्यात आले आहे.   

6/7

भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक विर राघोजी भांगरे जलाशय  असे नाव देण्यात आले आहे. 

7/7

महायुती सरकारने  भंडारदरा धरणाचे नाव बदलण्याची मागणी मंजूर केली आहे.