बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! Royal Enfield ते Bajaj कंपनीच्या बाईक्स होणार लॉंच

Upcoming Bikes In India 2022 : नवरात्रीच्या निमित्ताने बाईक खरेदी करायचीये? मग ही बातमी तुमच्यासाठीच. आज आम्ही तुम्हाला सांगणार 'या' टॉप 5 अपकमिंग बाईक्स बद्दल, चला तर मग जाणून घेऊयात...

Sep 17, 2022, 23:55 PM IST
1/5

2022 Bajaj N150

Bajaj N150 बाईक अलीकडेच स्पॉट झालीये, यानंतर तिच्या लॉन्चच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ही बाईक 2022 मध्ये लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. या बाईकमध्ये 150cc चं इंजिन असण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या बाईकबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये.  (PS: zigwheels)

2/5

Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Himalayan 450 लाँच करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अलीकडेच, कंपनीचे एमडी सिद लाल यांनी या आगामी बाइकच्या लॉन्चची पुष्टी केलीये. आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत या नव्या बाईकमध्ये मेकॅनिकल आणि कॉस्मेटिक असे दोन्हीं बदलण्यात येणार आहेत.

3/5

Hero XPulse 400

400cc इंजिन सेगमेंटमधील स्पर्धेमुळे Hero लवकरच Hero XPulse 400 बाईक लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने XPulse 2004V रॅली एडिशन लॉन्च केलं होते. (PS: zigwheels)

4/5

Hero Xtreme 400S

काही दिवसांपूर्वी Hero Xtreme 400S चं टेस्टिंग मॉडेल स्पॉट झालं, जे या बाईकच्या लॉन्चची पुष्टी करतं. Hero XPulse 400 सोबत कंपनी ही दुसरी बाईक देखील लॉन्च करू शकते. (PS: zigwheels)

5/5

Royal Enfield Shotgun 650

Royal Enfield Shotgun 650 ची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. नवीन शॉटगन रॉयल एनफिल्डच्या सर्वात शक्तिशाली बाइक्सपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. हे पूर्णपणे नवीन डिझाइनसह लॉन्च केले जाऊ शकते. (PS: bikewale)