PHOTO : 1979 मधील सर्वात हिट चित्रपट, कमी बजेट आणि तगडी कमाई; निर्माते पैसे मोजता मोजता थकले

Biggest Hit of 1979 : आजकाल बहुतेक चित्रपट 100-200 कोटींच्या घरात तयार होतात. पण सुमारे 45 वर्षांपूर्वी एका असा चित्रपट होता जो 40 दिवसांमध्ये तयार झाला. कलाकार त्यांचेच कपडे घालायचे, अभिनेत्याची कार वापरण्यात आली. एवढंच नाही तर दिग्दर्शकाच्या घरात शुटिंग झालेल्या या 1 कोटींच्या बजेटचा चित्रपट नुसात हिट ठरला नाही तर त्याने 7 पट कमाई केली होती. 

Sep 13, 2024, 16:40 PM IST
1/9

हा एक असा चित्रपट आहे ज्यासाठी केवळ निर्मात्यांनीच नाही तर स्टार्सनीही तो हिट होण्यासाठी दिवसरात्र एक केले होते. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. 1 कोटींची बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने 7 पटीने जास्त कलेक्शन केलेला हा चित्रपटाच नाव आहे गोलमाल.    

2/9

या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते अमोल पालेकर आणि त्यांच्यासोबत उत्पल दत्त, बिंदिया गोस्वामी, देवन वर्मा, डेव्हिड इब्राहिम, मंजू सिंग आणि ओम प्रकाश यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं तर संगीत आरडी बर्मन यांचं होतं. संपूर्ण चित्रपटात चार गाणी होती. 

3/9

'गोलमाल' चित्रपट प्रदर्शित होऊन 45 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 40 दिवसांत पूर्ण झालं. चित्रपटाचे बजेट फक्त 1 कोटी रुपये होते आणि त्याने 7 कोटी कमावले होते. इतक्या कमी बजेटमध्ये एवढ्या मोठ्या कलेक्शनमुळे हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरला होता. 

4/9

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती बिंदिया गोस्वामी नसून रेखा होती. पण नंतर त्याच्या लक्षात आले की अशा उत्कृष्ट अभिनेत्रीला पुरुषकेंद्रित चित्रपटात कास्ट करणे म्हणजे आपली प्रतिभा वाया घालवण्यासारखे असेल. यानंतरही त्यांनी रेखाऐवजी बिंदियाला साइन केलं. 

5/9

हृषिकेश मुखर्जीचा चित्रपट गोलमाल बंगाली चित्रपट 'कांचा मीथा'पासून प्रेरित होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शकाच्या मनात गोलमाल बनवण्याची कल्पना आली होती. कांचा मीथा या चित्रपटातील मुख्य पात्र आपल्या चुका लपवण्यासाठी अनेक खोटे बोलतो आणि शेवटी तो स्वतःच अडकतो, असं दाखवण्यात आलं होतं. 

6/9

'गोलमाल'मध्ये त्यांनी स्वतःच्या ध्यास या चित्रपटातील एक सीन टाकला होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन एका मुलीसोबत फ्लर्ट करतात पण गोलमालमध्ये अमोल पालेकर यांनी हा सीन केला आहे. 

7/9

1975 ते 80 या काळात भारतात चित्रपटाची तिकिटे 2 ते 3 रुपयांना विकली जात होती. त्यावेळी एक रुपया 1.50 डॉलर इतका होता. गोलमाल या चित्रपटाने भारतात 3.1 कोटींची तर जगभरातून 7.2 कोटींची कमाई केली होती. 

8/9

मीडिया रिपोर्टनुसार गोमालच्या शूटिंगदरम्यान चित्रपट कलाकारांनी त्यांच्या खऱ्या कपड्यांमध्येच चित्रीकरण केलं होतं. इतकंच नाही तर देवेंद्र वर्मा यांना त्यांच्याच कारमधून चित्रपटात एका सीनमध्ये वापर करण्यात आलाय. दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या घरातील अनुपमाच्या आजूबाजूला या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलंय. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाच्या हॉलचे भवानी फर्ममध्ये रूपांतर करण्यात आलं. त्यांची ड्रॉईंग रुम रामप्रसाद यांच्या घरात आणि त्यांच्या बागेत पार्टी सीक्वेन्सचे चित्रीकरण झालं होतं. 

9/9

बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा रिमेक आला होता. ज्यात अजय देवगण आणि अभिषेक बच्चन दिसले होते. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या अनेक मालिका प्रदर्शित झाल्या आहेत आणि या सर्वांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.