दुर्धर आजार, मूळचे आफ्रिकन, 7 मुलं, अर्धवट शिक्षण अन्...; Elon Musk यांच्याबद्दलचे ठाऊक नसलेले 20 Facts

Birthday Surprising Facts About Elon Musk: एलॉन मस्क यांचं नाव वाचलं नसेल अशी तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भातील माहिती असलेली व्यक्ती सापडणं कठीणच. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क हे त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. मस्क यांचा आज वाढदिवस, टेस्लाचे सीईओ, स्पेसएक्स याशिवायही मस्क यांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. मात्र मस्क यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांना ठाऊक नाहीत. त्यावरच टाकलेली ही नजर...

Jun 28, 2023, 12:27 PM IST
1/21

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्पेसएक्सचे संस्थापक एवढीच मस्क यांची ओळख नाही. मस्क हे जगतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांना ठाऊक नाही. अशाच काही खास गोष्टी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात...

2/21

20 Surprising Facts About Elon Musk

टेस्ला कंपनीचा वाईट काळ सुरु होता तेव्हा एलॉन मस्क ही कंपनी गुगलला विकणार होते. यासंदर्भातील उल्लेख 'एलॉन मस्क : टेस्ला, स्पेसएक्स अॅण्ड क्विस्ट ऑफ द फॅनटॅस्टीक फ्यूचर' या पुस्तकात आहे.

3/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क यांनी गुगलचे तत्कालीन कार्याकारी अधिकारी लेरी पेज यांची यासंदर्भात भेट घेतल्याचीही चर्चा होती. 2013 मध्ये या दोघांमध्ये कंपनीची डील 6 बिलिअन अमेरिकी डॉलर्सला झालेली. मात्र यात पुढे काहीही घडलं नाही.

4/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क हे स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात अवघे 2 दिवस टीकले. त्यांनी शालेय शिक्षणही अर्ध्यात सोडलं. त्यांना स्टॅण्डफोर्ड विद्यापीठातून फिजिक्समध्ये डॉक्टरेटचं शिक्षण घ्यायचं होतं.

5/21

20 Surprising Facts About Elon Musk

मात्र स्टॅण्डफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेण्याऐवजी 2 दिवसामध्ये बाहेर पडून मस्क यांनी स्वत:ची Zip2 ही स्टार्टअप कंपनी सुरु केली. त्यांनी 4 वर्षानंतर ही कंपनी 300 मिलियन अमेरिकी डॉलर्सला विकली.

6/21

20 Surprising Facts About Elon Musk

2013 मध्ये मस्क यांनी 'लोटस स्पीरीट' ही कार 1 मिलियन अमेरिकी डॉलर्सला विकत घेतली. यामागील कारण ठरलं 'द स्पाय हू लव्हड मी' या जेम्स बॉण्डच्या चित्रपटामध्ये याच गाडीच्या मॉडेलमध्ये मॉडिफिकेशन करुन तिला अंडरवॉटर कार म्हणून दाखवण्यात आलेलं.

7/21

20 Surprising Facts About Elon Musk

टेस्लाचा सायबरट्रक डिझाइन करताना आपल्याला या 'लोटस स्पीरीट' कारची मदत झाली होती असं मस्क यांनी मान्य केलं.

8/21

20 Surprising Facts About Elon Musk

एलॉन मस्क यांना एकूण 7 मुलं आहेत. यापैकी 5 मुलं त्याची पूर्वाश्रमीची पत्नी जस्टीनपासून आहेत. तर अन्य 2 मुलं ही गायिका ग्रीमीसपासून आहेत. तसेच मस्कच्या नेव्हाडा नावाच्या मुलाचा 2002 साली मृत्यू झाला.

9/21

20 Surprising Facts About Elon Musk

2021 मध्ये 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मस्क यांनी मुलांना जन्म घातला नाही तर सिव्हिलायझेशन म्हणजेच समाज कोलमडून पडेल असं म्हटलं होतं. "मी चांगलं उदाहरण समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मी जे बोलतो तेच फॉलो करतो," असंही मस्क यांनी आपल्या आपत्यांबद्दल बोलताना म्हटलं होतं.

10/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क हे मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकले आहेत. त्यांच्या नावाने आयएमडीबी पेजही आहे. ते सर्वात आधी 2010 साली 'आर्यन मॅन 2'मध्ये झळकले होते. त्यानंतर त्यांनी 'द बिग बँग थेअरी'मध्येही काम केलं होतं. 

11/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क हे कार्टून व्हर्जनमध्येही 'द सिम्पसन्स', 'साऊथ पार्क' आणि 'रिक अॅण्ड मॉर्टी'सारख्या मालिकांमध्येही झळकले आहेत.

12/21

20 Surprising Facts About Elon Musk

'आर्यन मॅन'मधील टॉनी स्टार्कची भूमिका साकारण्यासाठी रॉबर्ट ड्राऊनी ज्यूनिअरने मस्क यांची मदत घेतली होती. दोघांनीही भेटीदरम्यान टॉनी स्टार्कचं पात्र कसं असावं याबद्दल चर्चा केलेली. मस्क यांनी दिलेल्या टीप्सचा रॉबर्टला फायदा झालेला.  

13/21

20 Surprising Facts About Elon Musk

सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील असून वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत ते दक्षिण आफ्रिकेतच होते. त्यानंतर मस्क यांचं कुटुंब कॅनडामध्ये स्थायिक झालं. त्यांनी किंग्सट क्विन्स विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

14/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क हे एक्स डॉट कॉमचे सहसंस्थापक आहेत. ही एक ऑनलाइन बँक होती जी नंतर पेपल कंपनीच्या मालकीच्या एका कंपनीत विलीन झाली. ईबे या कंपनीने 2002 साली पेपल ही कंपनी 1.5 बिलिअन अमेरिकी डॉलर्सला विकत घेतली. या सर्व व्यवहारामध्ये मस्क यांना 175 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा फायदा झाला.

15/21

20 Surprising Facts About Elon Musk

याच पेपलच्या व्यवहारामधून मिळालेल्या कंपनीतून त्यांनी 2022 साली स्पेसएक्स कंपनीची स्थापना केली. अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर ही कंपनी अंतराळयानांबरोबरच अंतराळविरांनाही पाठवते.

16/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क यांनी अनेक कंपन्या सुरु केल्या आहेत. ते सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 200 बिलिअन अमेरिकी डॉलर्सहून अधिक आहे.

17/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क यांना Asperger’s syndrome हा आजार आहे. हा स्वमग्नतेचा (autism) एक प्रकार आहे. गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत करण्यात अडचणी निर्माण होते, सामाजिक स्तरावर संवाद साधताना अडखळणे यासारख्या समस्या असा लोकांना भेडसावतात.  

18/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क यांची आई माया मस्क या जगातील सर्वात वयस्कर स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड स्वीमसूट कव्हर मॉडेल आहेत. यंदाच्या वर्षी 74 वय असताना त्या कव्हर फोटोवर झळकल्यात.

19/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क हे जगभरामध्ये टेस्ला कंपनीमुळे ओळखले जात असले तरी ही कंपनी त्यांच्या संकल्पनेमधून सुरु झालेली नाही हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मार्टीन इबर्थहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी 2003 साली टेस्ला कंपनीची स्थापना केली. त्यानंतर मस्क यांनी एका वर्षाने या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आणि नंतर तिची मालकी विकत घेतली.

20/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क यांनी पहिल्या गुंतवणुकीमध्ये टेस्लामध्ये 6.35 मिलिअन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांनी 2004 साली केली. त्यानंतर ते कंपनीचे सीईओ झाले.

21/21

20 Surprising Facts About Elon Musk

मस्क हे टेस्लाचे कार्यकारी अध्यक्ष असले तरी ते कंपनीकडून पगार घेत नाहीत. यासंदर्भात कंपनीनेच जारी केलेल्या पत्रकामध्ये खुलासा केला आहे.