फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

Nov 04, 2020, 20:38 PM IST
1/6

फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्व कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचं कळताच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले. योग्य त्या उपचारांनंतर आता फडणवीसांनी कोरोनावर मात केली आहे.   

2/6

फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील काही फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.   

3/6

फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या फडणवीस यांचं यावेळी पत्नीनं आरती ओवाळून स्वागत केलं. 

4/6

फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

'आज रुग्णालयातून घरी परतलो. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे', असं ट्विट त्यांनी केलं.   

5/6

फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

आपल्या आरोग्यापोटी काळजी वाटणाऱ्यांच्या सगिच्यांबद्दलही त्यांनी सर्वांचे आभार मानले. 

6/6

फडणवीसांची कोरोनावर मात; घरी असं झालं स्वागत

फडणवीस यांनी कोरोनावर मात करुन ते स्वगृही परतले असले तरीही पुढील सात दिवस आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (सर्व छायाचित्रं- ट्विटर)