Tabu @50 : सर्व वयोगटातील अभिनेत्यांसोबत गाजला तब्बूचा रोमँटीक अंदाज

Nov 04, 2020, 17:32 PM IST
1/6

Tabu @50 : सर्व वयोगटातील अभिनेत्यांसोबत तब्बूचा रोमँटीक अंदाज सुपरहिट

अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये कथानकाच्या अनुषंगानं पुरुष पात्राला जितकं प्रकाशझोतात आणलं जातं त्याच तुलनेत आता स्त्री पात्राच्या भूमिकांनाही पसंती मिळू लागली आहे. अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्री तब्बू हिनं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेल्या. कोणत्याही वयोगटातील अभिनेत्यासह रंगेली तब्बूची केमिस्ट्री पाहता त्यात उणिवा काढायला कुठंही वाव नाही हेच खरं. चला तर मग, तिच्या अशाच काही गाजलेल्या भूमिकांवर एक नजर टाकूया....   

2/6

चांदनी बार

'मुमताज' नावाच्या बार डान्सरच्या भूमिकेतून तब्बू या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या भूमिकेत तिनं इतका जीव ओतला होता, की प्रेक्षकही भावूक झाले होते. 'चांदनी बार'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.   

3/6

चीनी कम

आपल्याहून वयानं दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्या मुलीची भुमिका तिनं इथे साकारली होती. या चित्रपटात ती बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह रोमँटिक अंदाजात दिसली होती.   

4/6

दृश्यम

सस्पेंस थ्रिलर अर्थात रहस्यमी थरारपट या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटातून तब्बू एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली होती. पोलीस अधिकारी आणि एक आई अशी दुहेरी बाजू तिच्या या भूमिकेला होती.   

5/6

जवानी जानेमन

बेभान आणि मनसोक्त आयुष्य जगणाऱ्या एका हिप्पी रुपातील मुलीची भूमिका तिनं या चित्रपटात साराकली होती. तिची ही अदा अनेकांनाच भावली होती. 

6/6

अ सुटेबल बॉय

हल्लीच प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमध्ये तब्बूनं साकारलेल्य़ा भूमिकेची सर्व स्तरांतून प्रशंसा केली जात आहे. अवघ्या २४ वर्षांच्या इशान खट्टर या अभिनेत्यासोबतच्या बोल्ड सीनमुळं तब्बू चर्चेत आली आहे.