Mahashivratri2024: स्वप्नशास्त्रानुसार शंकराशी संबंधित 'ही' स्वप्न कोणा आशिर्वादाहून कमी नाहीत

Mahashivratri2024:  असं म्हणतात की, आपण दिवसभरात जे पाहतो, अनुभवतो आणि विचार करतो ते आपल्याला स्वप्नात दिसतं. स्वप्नशास्त्रानुसार  काही स्वप्नं आपल्याला जर वारंवार असतील तर त्याचे शुभ आणि अशुभ असे फलित मिळतात. 

Mar 08, 2024, 14:45 PM IST
1/6

देवांचा देव महादेवाला मनोभावे हात जरी जोडले तरी तो आपल्या भक्तावर प्रसन्न होतो असं हिंदू पुराणात सांगितलं जातं. जर तुम्ही शिवभक्त असाल किंवा महादेवाशी संबंधित तुम्हाला स्वप्न पडत असतील तर या मागे काय संकेत असू शकतो ते जाणून घेऊया.   

2/6

रुद्राक्ष पाहण

जर तुम्हाला स्वप्नात रुद्राक्ष पाहिले तर हे खूप शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, स्वप्नात रुद्राक्ष पाहिले तर तुम्ही लवकरच मोठ्या आजारातून बरे होणार आहात. स्वप्नात रुद्राक्ष पाहणं असं सुचित करतं की येणाऱ्या काळात तुमचं आरोग्य निरोगी असणार आहे. 

3/6

शिवपिंडीवर अभिषेक करणं

महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असल्याचं स्वप्नात दिसलं तर हा संकेत आहे की, आगामी काळात तुम्ही नियोजलेली कामं पुर्ण होती. तुमच्या कामातील अडथळे दूर होणार आहेत असं हे स्वप्न सुचित करतं. 

4/6

नंदी बैल पाहणं

नंदी हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. स्नप्नात नंदी पाहणं असं सुचित करतं की तुम्हाला महादेवाचा आशिर्वाद लाभला आहे. स्वप्नशास्त्रानुसार स्नप्नात नंदी पाहिल्यास लवकरच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे असं म्हटलं जातं. 

5/6

बेलपत्र पाहणं

हिंदू शास्त्रात असं सांगितलं जातं की, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा पुर्ण होत नाही. जर तुम्ही स्वप्नात बेलाची पानं पाहिली तर हा संकेत शुभ मानला जातो. तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊन लवकरच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. 

6/6

शिवपिंड पाहण

स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात शिवपिंड पाहिली तर लवरच तुमचं भाग्या उजळणार असल्याचं सांगितलं. स्वप्नात शिवपिंड पाहण्याचा अर्थ असा होतो की , महादेवाचा तुम्हाला आशीर्वाद असून तुमच्या नोकरी-व्यवसायात उन्नती होणार आहे. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)