Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

Jul 03, 2021, 14:36 PM IST
1/6

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

Aamir Khan-Kiran Rao Divorce : बॉलिवूडमध्ये 'परफेक्शनिस्ट' म्हणून नावाजलेल्या अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे.   

2/6

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

'परफेक्ट कपल' म्हणून संबोधली जाणारी ही जोडी गेला काही काळ एकमेकांपासून विभक्त झाली असून, आता त्यांनी त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.   

3/6

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

15 वर्षांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देत येत्या काळात मुलाचं संगोपन करण्यासोबतच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.   

4/6

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

कित्येक वर्षांच्या सहजीवनानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी हे नातं संपुष्टात आणलं आहे. शनिवारी या दोघांनीही त्यांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.   

5/6

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

आमिर आणि किरणच्या नात्यात आलेलाय दुरावा अनेकांनाच धक्का देऊन गेला. काल-परवापर्यंत चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या जोडीच्या नात्यात असं नेमकं झालं तरी कीय की, त्यांना इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे.   

6/6

Aamir- Kiran Divorce : हम 'थे' राही प्यार के

आमिर आणि किरण यांच्या जोडीनं अनेक जोड्यांपुढे आदर्श ठेवला होता. कलाविश्वात अतिशय समर्पक वृत्तीनं काम करण्यासोबतच ही जोडी प्रसिद्ध होती, ती म्हणजे त्यांच्या मुलासोबतच्या नात्यासाठी. आझाद, किरण आणि आमिर यांनी एकमेकांसोबत व्यतीत केलेले खास क्षण आणि त्यांच्या अनेक छायाचित्रांना चाहत्यांची कायमच पसंती मिळाली आहे.