प्रियकर फरहानने शिबानीचा असा काही फोटो काढला की....

May 14, 2019, 12:42 PM IST
1/5

प्रियकर फरहानने शिबानीचा असा काही फोटो काढला की....

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर सध्याच्या घडीला बॉलिवूडच्या 'मोस्ट हॅपनिंग कपल्स'च्या यादीतील चर्चेत असणारी एक जोडी. गेल्या बऱ्याच काळापासून रिलेसनशिपमध्ये असणारे फरहान आणि शिबानी शक्य तेव्हा जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत व्यतीत करतात. (छाया सौजन्य़- इन्स्टाग्राम)

2/5

प्रियकर फरहानने शिबानीचा असा काही फोटो काढला की....

एखादा कॉन्सर्ट असो किंवा मग सुट्टीसाठी शहरी धकाधकीपासून दूर जाणं असो. फरहान-शिबानी कायमच त्यांच्या नात्याला प्राधान्य देतात. (छाया सौजन्य़- इन्स्टाग्राम)

3/5

प्रियकर फरहानने शिबानीचा असा काही फोटो काढला की....

सध्याच्या घडीला ही जोडी चर्चेत आली आहे ते म्हणजे पुन्हा एकदा शेअर करण्यात आलेल्या काही  काही फोटोंमुळे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बिकीनीतील एक पोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक अनेकांच्याच काळजाचे ठोके चुकवत आहे. शिबानीचा हा फोटो खास ठरण्यामागचं कारण तो टीपण्याची किमया करणारा व्यक्ती. खुद्द फरहानने तिचा हा फोटो काढला असल्याचं शिबानीने फोटोच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. (छाया सौजन्य़- इन्स्टाग्राम)

4/5

प्रियकर फरहानने शिबानीचा असा काही फोटो काढला की....

फरहाननेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिबानीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. अतिशय आनंदात असणारी ही जोडी पाहता, येत्या काळात ते कधी एकदा लग्नगाठ बांधणार याविषयीचीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य़- इन्स्टाग्राम)

5/5

प्रियकर फरहानने शिबानीचा असा काही फोटो काढला की....

गेल्या काही काळापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी बराच जोर धरला होता. पण, त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती मात्र मिळू शकली नाही. तूर्तास, 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो', असं म्हणत ही जोडी खऱ्या अर्थाने नात्यात आलेल्या प्रेमाचा बहराचा आनंद घेत आहे, असंच म्हणावं लागेल. (छाया सौजन्य़- इन्स्टाग्राम)