बद्रीनाथ यात्रेत अस्वल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

पर्यटकांसाठी तर हा क्षण आकर्षणाचा केंद्रबिंदू मानले जात आहे.  

May 13, 2019, 19:33 PM IST

बद्रीनाथ यात्रेसाठी आलेल्या भावीकांना याठिकाणी काळ्या अस्वलाचे दर्शन झाले आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस हे अस्वल मस्त भटकंती करत आहेत. त्यांच्या अचानक दिसण्यामुळे भक्तांमध्ये चांगला उत्साह संचारलेला दिसत आहे. पर्यटकांसाठी तर हा क्षण आकर्षणाचा केंद्रबिंदू मानले जात आहे.  

1/5

उत्तराखंड मधील बद्रीनाथ यात्रेमुळे देश-विदेशातील पर्यटकांना एक आनंदाचा क्षण अनुभवता येत आहे. आताच्या तापत्या उन्हामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत आहेत, तर दुसरीकडे बद्रीनाथच्या यात्रेकरूंना थंड वातावरण अनुभवता येत आहे. 

2/5

डोंगरळ प्रदेशात दुपारनंतर आस्वल मोकळे फिरताना दिसत आहेत. अस्वलांप्रमाणेच मोनाल पक्षी सुद्धा भक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करत आहेत. मानोल पक्ष्यांची प्रजात दुर्मिळ प्रजांति पैकी एक आहे.

3/5

डोंगराळ प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या अस्वलांना काळे अस्वल असे म्हंटले जाते. अस्वलांचं डोकं माणसांच्या डोक्यासारखेच असते, कित्येकवेळा अस्वल माणसांवर देखील हल्ला करतात.

4/5

अस्वल समोर असणं ही मोठ्या धोक्याची बाब आहे. बर्फाळ प्रदेशांमध्ये लोक जेव्हा त्यांच्या घराच्या खालील भागात जातात, तेव्हा हे अस्वल घरांच्या वरील भागात हल्ला करतात आणि घुसखोरी करून मिळेल ते अन्न खातात.

5/5

अस्वलांच्या या मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांना अस्वलांचा त्रास सहन करावा लागतो. परंतू हेच आस्वल सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.