सेलिब्रिटी कपलचा Vacation Mode ऑन....

Oct 20, 2019, 14:11 PM IST
1/5

सेलिब्रिटी कपलचा Vacation Mode ऑन.....

शारीरिक सुदृढता, फिटनेस या साऱ्या गोष्टींना प्राधान्य देणारी जोडी, म्हणजेच अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार. साचेबद्ध नात्यांची बंधंनं झुगारत त्यांनी हे सुरेख नातं सर्वांसमोर आणलं. या नात्याच्या सुरुवातीपासूनच मिलिंद आणि अंकिताचा चाहत्यांनीही तितक्याच आपलेपणाने स्वीकारलं. असं हे सेलिब्रिटी कपल सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.  (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/5

सेलिब्रिटी कपलचा Vacation Mode ऑन.....

सोशल मीडियावर खुद्द मिलिंद आणि अंकितानेच त्यांच्या या सुट्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहता कामाच्या व्यापात व्यग्र असणाऱ्या अनेकांनाच या साऱ्यापासून कुठेतरी दूर निघून जाण्याती इच्छा होत असणार असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)  

3/5

सेलिब्रिटी कपलचा Vacation Mode ऑन.....

मिलिंद आणि अंकिताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्रीही सर्वांचं लक्ष वेधत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/5

सेलिब्रिटी कपलचा Vacation Mode ऑन.....

कायमच एकमेकांची साथ देणारी ही जोडी आणि सहसा #FitnessGoals देणारी ही जोडी यावेळी मात्र #TravelGoals देत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/5

सेलिब्रिटी कपलचा Vacation Mode ऑन.....

सोशल मीडियावर वेस्टर्न रिजन आयलँडवर अंकिता आणि मिलिंद व्यतीत करत असणारा हा वेळ आणि त्यांचे हे सुरेख फोटो चाहत्यांचीही मनं जिंकत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)