लवकरच आई होणार असलेल्या आलियाचे लहानपणीचे फोटो व्हायरल, चाहत्यांकडून होतेय फोटोची चर्चा

आलियाच्या बालपणाचे 'हे' फोटो पाहाल तर पाहतच रहाल...

Jul 19, 2022, 21:03 PM IST

Alia Bhatt Childhood Pictures : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट च्या cutealiaabhatt  नावाच्या एका फॅन अकाऊंटने तिच्या बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया खूपच क्यूट दिसत आहे.

1/10

आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1996 ला झाला.

2/10

तिचे वडील महेश भट्ट हे प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आहेत.

3/10

आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे.

4/10

वयाच्या पाचव्या वर्षी आलियाने संघर्ष (1999) या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. या चित्रपटात आलियाने प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

5/10

2012 मध्ये प्रदर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटपटातून आलियाने फिल्म इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात तिने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवनसोबत काम केलं होते.

6/10

'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटासाठी आलियाने 16 किलो वजन कमी केलं होतं.

7/10

 'स्टुडंट ऑफ द इयर', 'गली बॉय', 'राझी' आणि 'उडता पंजाब' हे आलिया भट्टचे काही हिट चित्रपट आहेत.

8/10

ब्रह्मास्त्र आणि डार्लिंग्स हे चित्रपट आलिया भट्टचे आगामी चित्रपट आहेत.

9/10

यावर्षी आलिया भट्टने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली आहे. हे लग्न 14 एप्रिलला मुंबईत झालं होतं. या लग्नाला जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.

10/10

अलीकडेच आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं आहे.