पहिल्या चित्रपटात मिळाले फक्त 10 रुपये, आता खोऱ्याने पैसे ओढतीये 'ही' स्टार अभिनेत्री; ओळखलंत का?

Bollywood Actress Childhood Photo: सध्या एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. केवळ हिंदीतच नाही तर दक्षिण चित्रपटसृष्टीतही यश मिळवलंय.

Jul 10, 2023, 23:17 PM IST

Jaya Prada Nahata Childhood Photo: सोशल मीडियावर अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात.  अशातच सध्या एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. केवळ हिंदीतच नाही तर दक्षिण चित्रपटसृष्टीतही यशाच्या शिखरांना स्पर्श केलेल्या या अभिनेत्रीची ओळख सर्वांसाठी नवी नाही.

1/5

कपाळावर बिंदी आणि डोळ्यात काजल घालून वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी साऊथ चित्रपटात पदार्पण करणाऱ्या जया प्रदा यांचा फोटो व्हायरल होतोय.

2/5

पहिल्या चित्रपटासाठी जया प्रदा यांना फक्त 10 रुपये फी देण्यात आली होती आणि इथूनच तिचा चित्रपट प्रवास सुरू झाला.

3/5

अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे जया प्रदा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनल्या होत्या.

4/5

जया प्रदा मागील काही वर्षांपासून राजकारणात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जयाप्रदा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

5/5

जया प्रदा यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राकेश रोशन आणि जितेंद्र यांसारख्या अव्वल कलाकारांसोबत अनेक चित्रपट केले.