हिरो रात्री 3 वाजता घरी बोलवतोय तर जावं लागत नाहीतर...बॉलिवूड अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव

 मी तडजोड करण्यास नकार दिला म्हणून सर्व ए-लिस्टर कलाकारांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला', असे तिने यावेळी सांगितले. 

| Feb 17, 2024, 13:36 PM IST

Bollywood Actress Mallika Sherawat: मी तडजोड करण्यास नकार दिला म्हणून सर्व ए-लिस्टर कलाकारांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला', असे तिने यावेळी सांगितले. 

1/9

हिरो रात्री 3 वाजता घरी बोलवतोय तर जावं लागत नाहीतर...बॉलिवूड अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

Casting Couch Experince: छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींनी आपल्याला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव समोर येऊन निर्भीडपणे सांगितला आहे.

2/9

धक्कादायक अनुभव

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

हिंमत करुन अभिनेत्री पुढे येत आहेत आणि आपल्याला आलेला धक्कादायक अनुभव उघडपणे सांगत आहेत. यानिमित्ताने कास्टिंग काऊचबद्दल खुलेपणाने बोलले जात आहे. 

3/9

अनेकदा कॉम्प्रमाईज

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

आम्हाला चित्रपटात काम करण्यासाठी अनेकदा कॉम्प्रमाईज करण्यास सांगितले असे अनेक अभिनेत्रींनी सांगितले आहे. त्यात आता 'मर्डर' फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही तिच्या बॉलिवूडमध्ये आलेल्या अनुभवाचा खुलासा केला आहे. 

4/9

खुलासा ऐकून सगळेच हैराण

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

कास्टिंग काउचबाबत तिने केलेला खुलासा ऐकून सगळेच हैराण झाले. मला माझे काम टिकवण्यासाठी काहीही करायला सांगण्यात आले. पण मला कोणाच्याही वेडाचा भाग बनायचे नव्हते.

5/9

तडजोड करण्यास नकार

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

मल्लिका शेरावतने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला. 'मी तडजोड करण्यास नकार दिला म्हणून सर्व ए-लिस्टर कलाकारांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला', असे तिने यावेळी सांगितले. 

6/9

तशा नायिका अभिनेत्यांना आवडतात

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

ज्यांना नियंत्रित करू शकतो आणि त्यांच्याशी तडजोड करण्यास तयार असतीस अशा नायिका अभिनेत्यांना आवडतात. मी तशी नाही आणि माझे व्यक्तिमत्वही तसे नाही. मला स्वत:ला कोणाच्याही लहरीपणाचा आणि आवडीनिवडीचा भाग बनवायचा नाही.

7/9

रात्री 3 वाजता नायकाच्या घरी

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

मल्लिका शेरावत पुढे म्हणाली, 'ए-लिस्टर कलाकारांनी तुम्हाला बसायला, उभे राहायला, काहीही करायला सांगितले तर तुम्हाला ते करावे लागेल. जर नायक तुम्हाला 3 वाजता फोन करेल आणि म्हणाला, 'माझ्या घरी या', तुम्हाला जावे लागेल.

8/9

चित्रपटातून बाहेर

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

जर तुम्ही त्या सर्कलमध्ये असाल आणि तुम्ही तो चित्रपट करत असाल तर हे करावे लागते. जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला चित्रपटातून बाहेर फेकले जाते, असेही ती म्हणाली. 

9/9

'Rk/Rkay' सिनेमा रिलीज

Bollywood Actress Mallika Sherawat Share Casting Couch Experince

मल्लिका शेरावतचा 'Rk/Rkay' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तिचा हा चित्रपट कधी आला आणि गेला हेही कोणाला कळले नाही. पण तिच्या या विधानाची चांगलीच चर्चा झाली.