शिल्पा शेट्टीच्या 'Fitness app'ची गुगल प्लेवर बाजी

Dec 06, 2019, 16:40 PM IST
1/5

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं 'शिल्पा शेट्टी अॅप' हे फिटनेस अॅप आहे. शिल्पाच्या या 'शिल्पा शेट्टी अॅप'ने गूगल प्लेच्या बेस्ट अॅप फॉर २०१९च्या 'पर्सनल ग्रोथ' श्रेणीमध्ये अवॉर्ड मिळवला आहे. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)

2/5

शिल्पाने गुरुवारी इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)

3/5

शिल्पाने एक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. येणारं वर्ष आणखी सुंदर असण्याचा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)

4/5

शिल्पा तिच्या अॅपवर फिटनेस संदर्भात अनेक गोष्टी पोस्ट करत असते. या अॅपवर ती डाएट, योगा, व्यायाम, मेडिटेशन, रेसिपी याशिवाय इतरही गोष्टींची माहिती देत असते. तिच्या इन्स्टाग्रामवरुनही फिटनेस मंत्रा शेअर करत असते. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)

5/5

तब्बल १२ वर्षांनंतर शिल्पा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'निकम्मा' चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या लखनऊमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. (फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम)