लॅम्बॉर्गिनीमध्ये अडकली बॉलिवूड अभिनेत्री, Photo पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
Jul 26, 2021, 16:13 PM IST
1/6
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे उर्वशी रौतेला. उर्वशी कायमच बहुविध कारणांनी अनेकांचं लक्ष वेधत असते.
2/6
सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे तिनंच पोस्ट केलेले काही फोटो.
TRENDING NOW
photos
3/6
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये उर्वशी, पिवळ्या रंगाच्या सुरेख कारमधून बाहेर येताना दिसत आहे. हे फोटो पाहून तिला कारमध्ये बसण्यास किती अडचणी आल्या हे स्पष्ट दिसत आहे.
4/6
खुद्द उर्वशीनं तिच्या फोटोसह कॅप्शनमध्ये नेमकं आपल्याला कोणत्या अडचणी आल्या त्याबाबत लिहिलं आणि ते वाचून नेटकऱ्यांना हसू आवरलं नाही.
5/6
उंच मुलींना अशाच अडचणींचा सामना करावा लागतो, असं तिनं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
6/6
उर्वशीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले हे फोटो तिच्या या कॅप्शनमुळेच जास्त गाजले. काही मिनिटांमध्येच तिच्या या फोटोला असंख्य लाईक्स मिळाल्या, तर काहींनी यावर विनोदी कमेंट्स केल्या. (छाया सौजन्य- सर्व छायाचित्र/ उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link