कुणी तरी येणार येणार गं...! 'हे' बॉलिवूड कलाकार लवकरच होणार आई-बाबा

अनेकांनी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. 

Feb 28, 2024, 21:52 PM IST

अनेकांनी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. 

1/8

अनेक कलाकारांनी सुरु केली बाळाच्या स्वागताची तयारी

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे पहिल्या बाळाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. अनेकांनी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. 

2/8

वरुण धवन लवकरच बाबा होणार

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा लवकरच बाबा होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघेही 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षानंतर वरुण धवन आणि नताशा हे दोघेही आई-बाबा होणार आहेत.  

3/8

वरुण धवन-नताशा दलाल

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

वरुणने त्याची पत्नी नताशा दलालसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील फोटो पोस्ट केला. या फोटोत वरुण पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना पाहायला मिळत आहे. "वी आर प्रेग्नेंट, आम्हाला तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे", असे वरुण धवनने म्हटले आहे.   

4/8

अलाना पांडे

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच आई होणार आहे. अलानाने मॅटर्निटी फोटोशूट करत ही गुडन्यूज दिली होती. 

5/8

अनन्या पांडे होणार मावशी

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर बहीण अलाना आई होणार असल्याची माहिती दिली. अलानाने तिच्या पतीचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. “मी आता मावशी होणार आहे. बेबी, मी तुझ्यावर प्रेम करते.” असे अनन्याने म्हटले आहे. 

6/8

यामी गौतम

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि चित्रपट निर्माता आदित्य धर यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी आणि आदित्य आई-बाबा होणार आहे. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे.

7/8

ऋचा चड्ढा

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अली फजल यांनीही काही दिवसांपूर्वी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी '१+१=३' असे लिहिले होते. त्याबरोबर गरोदर महिलेचा इमोजीही वापरण्यात आला होता.  

8/8

अमला पॉल

Bollywood Couples officially announced Pregnancy Alanna Panday to Varun Dhawan know the Celebrity name

अजय देवगणच्या भोला चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल लवकरच आई होणार आहे. अमला पॉल आणि जगत देसाई  यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे.