सगळेच शाहरुख खान नसतात! बॉलिवूडचे सर्वात फ्लॉप 7 खान

बॉलिवूडचे खान म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते फक्त सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खान. ते आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. पण तुम्हाला असे 7 खान माहित आहेत का ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं पण यशस्वी होऊ शकले नाहीत. 

Aug 13, 2024, 14:21 PM IST
1/7

फैसल खान

फैसल खान हा आमिर खानचा धाकटा भाऊ आहे. फैसल खानने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिरच्या 'मेला' चित्रपटात काम केलं होतं. ज्यामध्ये त्याने शंकर सेनची भूमिका साकारली होती. आमिर खान हा हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो पण फैसल खानचा प्रवास हा फ्लॉप ठरला. त्यानंतर फैसलने चित्रपटात यश न मिळाल्याने स्वत:ला अभिनयापासून दूर ठेवले. 

2/7

फरदीन खान

हिंदी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खाननं  'प्रेम आंगन' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. अभिनयासोबतच तो त्याच्या लूकमुळे ओळखला जात होता. पण फरदीन जास्त काळ त्याचं अस्तित्व चित्रपटसृष्टीमध्ये टिकवू शकला नाही. बराच वेळ लाइमलाइटपासून दूर राहिल्यानंतर यावर्षी त्यानं संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' सीरीज मधून कमबॅक केलं. 

3/7

सरफराज खान

सरफराज हा आपल्या अभिनयाने आणि विनोदाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता कादर खान यांचा मुलगा आहे. वडिलांनी यशाचं शिखर गाठलं असलं तरी देखील सरफराजला हवं तसं यश मिळालं नाही. सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्याने साकारली होती. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्याने काही काळ काम करून चित्रपटसृष्टीपासून तो दूर गेला. 

4/7

शादाब खान

 प्रसिद्ध अभिनेते अमजद खान यांचा मुलगा शादाब खान याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, वडिलांनी मिळवले तेवढे यश त्याला मिळवता आले नाही. यानंतर त्याने दिग्दर्शन आणि लेखन यामध्ये देखील करिअर करण्याचा प्रयत्न केला पण तिथे सुद्दा तो अपयशी ठरला. शादाबने अनेक क्षेत्रात हात आजमावला पण प्रत्येक वेळी त्याला हवं तसं यश मिळालं नाही.

5/7

शहजाद खान

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अजित खान यांचा मुलगा शहजाद खान यांने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. शहजादने आपल्या वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात प्राविण्य दाखवले, मात्र तो आपल्या चित्रपटांमध्ये वडीलांप्रमाणेच छाप पाडू शकला नाही. पुरेसे यश न मिळाल्याने शहजादने चित्रपटाच्या जगापासून दूर जायचे ठरवले. 

6/7

इमरान खान

सुपरस्टार आमिर खानचा पुतण्या इमरान खानने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे पण अभिनय क्षेत्रात हवी तशी चमक मिळवू शकला नाही. त्यानं त्याच्या कारकिर्दीत फार कमी हिट चित्रपटांमध्ये काम केले कारण त्याला बहुतेक अयशस्वी चित्रपट मिळाले. हळूहळू त्याची चित्रपट क्षेत्राबद्दलची चमक ओसरली आणि त्यापासून दूर गेला. 

7/7

जायद खान

जायद खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांचा मुलगा आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर शाहरूख खानच्या 'मै हूं ना', 'शब्द', 'दस', 'युवराज' , 'ब्लू' आणि 'अंजाना अंजानी' या चित्रपटांमध्ये दिसून आला. 2010 मध्ये करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यात त्याला काही यश मिळाले पण त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि त्यांनी अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.