आधार कार्डवरील पत्ता किती वेळा बदलू शकता? वाचा सविस्तर

तुमच्या घराचा पत्ता बदलल्यानंतर तुम्हाला आधार कार्डमधील पत्ता देखील बदलावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का आधार कार्डवरील पत्ता किती वेळा बदलता येतो? नसेल तर जाणून घ्या.

| Aug 13, 2024, 13:49 PM IST
1/7

आधार कार्ड

देशात राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. तुम्हाला अनेक ठिकाणी त्या कागदपत्रांची गरज भासत असते. 

2/7

आवश्यक कागदपत्रे

यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर देखील कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे. 

3/7

किती लोकांकडे आधार कार्ड

सध्या आधार कार्ड हे सर्वात सामान्य कागदपत्र आहे. देशातील 90 टक्के लोकांकडे सध्या आधार कार्ड आहे. 

4/7

UIDAI कडून संधी

नवीन आधार कार्ड काढताना खूप लोक चुकीची माहिती टाकताना दिसतात. पण UIDAI त्यांना या माहितीत बदल करण्याची संधी देत असते. 

5/7

ऑनलाइन किंवा ऑफलाईन

यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या माहिती अंतर्गत आधार कार्डमध्ये बदल करु शकता. ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने बदल करु शकता. 

6/7

कोणतीही मर्यादा नाही

मात्र, आधार कार्डवरील पत्ता किती वेळा तुम्हाला बदलता येतो हे माहिती आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की UIDAI ने आधार कार्डवरील पत्ता बदलण्याबाबत कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही. 

7/7

घरबसल्या पत्ता बदलू शकता

म्हणजेच एखादी व्यक्ती आधार कार्डवरील पत्ता त्याला पाहिजे तितक्या वेळा बदलू शकते. तुम्ही घरबसल्या देखील आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता.