हाडांपासून ते हृदयरोगापर्यंत मिरची ठेवते अनेक आजारांपासून दूर, 5 आरोयग्यदायी फायदे वाचाच

ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.

Aug 30, 2024, 13:13 PM IST

Benefits Of Lutein: ल्युटीन हा फ्लेव्होनॉइडचा (Flavonoid) एक प्रकार आहे, जो  काही वनस्पती आणि अनेक खाद्यपदार्थांमध्येही असतो. हे एक प्रकारचा फायटोकेमिकल (Phytochemical) आहे. ज्याचे अनेक उपयोग आणि फायदे असू शकतात. 

1/7

ल्युटीन विशेषतः मिरची, सेलेरी, गाजर आणि कॅमोमाइल चहामध्ये आढळते. चला जाणून घेऊया मिरचीपासून मिळणाऱ्या या ल्युटीनचे नक्की कोणते फायदे आहेत.

2/7

1. नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स  (Natural Antioxidants)

ल्युटीन हे एक प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे. जे तुमच्या शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. हे रॅडिकल्समधील नुकसानकारक घटकांशी लढते आणि पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते.

3/7

2. तणाव कमी होईल

ल्युटीनचा वापर सर्वसाधारणपणे तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांती वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.

4/7

3. अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties)

ल्युटीनमध्ये दाहक-विरोधी म्हणजेच अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जळजळ कमी करण्यास मदत होऊ शकते. हे आपले आरोग्य चांगले ठेवण्यास आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.

5/7

4. हृदयाचे आरोग्य

ल्युटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारले जाऊ शकते. हृदयविकाराचा झटका, ट्रिपल वेसल आणि कोरोनरी आर्टरी संबंधीत समस्यांपासून संरक्षण देते.  

6/7

5. कर्करोगविरोधी गुणधर्म (Anti Cancer Properties)

वनस्पतींवर आधारित खाद्यपदार्थांमध्ये आढळणाऱ्या ल्युटीनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. हे कर्करोगास कारणीभूत घटकांविरुद्ध कार्य करते आणि या गंभीर आजारापासून आपले संरक्षण करते.  

7/7

6. हाडे मजबूत होतात

ल्युटीन मिळणाऱ्या पदार्थाचे सेवन केल्यास हाडांचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर हे तुमची हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)