अवघ्या 10 लाखांत घ्या 7 सीटर कार; बुकिंग करा फक्त 25,000 रुपयांत

Citroen India ने C3 Aircross ला 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत (एक्स-शोरूम) लाँच केले आहे. C3 Aircross ची सुरुवातीची किंमत 9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.

Sep 21, 2023, 17:45 PM IST
1/8

भारतीय बाजारपेठेसाठी खास डिझाइन

Exclusively designed for the Indian market

Citroen C3 Aircross हे 7-सीटर वाहन असेल जे भारतीय बाजारपेठेसाठी भारतात डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. ही B-SUV पहिल्यांदाच भारतात सादर करण्यात आलं आहे.

2/8

ह्युंदय आणि कियाला देणार टक्कर

Citroen C3 Aircross SUV

Citroen C3 Aircross SUV ही CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही SUV भारतीय बाजारपेठेत Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या कारशी स्पर्धा करणार आहे.

3/8

10 लाखांपेक्षा कमी किंमत

Citroen C3 Aircross price

Citroen ने शेवटी C3 Aircross midsize SUV लाँच केली आहे बेस U व्हेरियंट मध्ये 9.99 लाख (एक्स-शोरूम) किमतीला लॉन्च केली आहे.

4/8

25 हजारात कार बुक करा

Citroen C3 Aircross

25,000 रुपये टोकन रक्कम भरून सिट्रोएनकडून कार बुक करता येते. त्याची डिलिव्हरी 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

5/8

C3 Aircross ला दोन इंजिन पर्याय

Citroen C3 Aircross engin

C3 एअरक्रॉस दोन इंजिन पर्यायांसह आहे. 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकतात

6/8

डिझाइन

citroen c3 aircross design

C3 एअरक्रॉसमध्ये प्रमुख ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स आणि उंच बॉडीसह आकर्षक डिझाइन आहे. कारच्या आत एक आरामदायक इंटीरियर आहे ज्यामध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सनरूफ समाविष्ट आहे.

7/8

4 मोनोटोन आणि 6 ड्युअल-टोन एक्स्टीरिअर शेड्स

Citroen C3 Aircross color

ग्राहक ही एसयूव्ही 4 मोनोटोन आणि 6 ड्युअल-टोन बाह्य शेडमध्ये निवडू शकतात. मोनोटोन्समध्ये पांढरा, राखाडी, प्लॅटिनम आणि कॉस्मो ब्लू यांचा समावेश आहे. दुसरीकडे, ड्युअल टोन पर्यायांमध्ये प्लॅटिनम ग्रे रूफसह पोलर व्हाइट, कॉस्मो रूफ रूफसह पोलर व्हाइट आणि स्टील ग्रे, पोलर व्हाइट रूफसह स्टील ग्रे, प्लॅटिनम ग्रे आणि कॉस्मो ब्लू यांचा समावेश आहे.

8/8

सुरक्षेसाठी व्यवस्था

Citroen C3 Aircross safty

गाडीच्या बेस-स्पेक मॉडेल सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते ज्यात दोन एअरबॅग, EBD सह ABS, ESC, हिल-होल्ड असिस्ट, TPMS आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे.