लग्नानंतर पाठवणीसाठी निघालेल्या नवरीला प्रियकराने रस्त्यातूनच पळवले

May 14, 2019, 14:14 PM IST
1/4

झारखंडची राजधानी रांचीतील धुर्वा पोलीस स्टेशन भागात एका जोडप्याचं मोठ्या धामधुमीत लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर नवरीची पाठवणी करण्यात आली. परंतु लग्नानंतर आपल्या सासरी जात असताना नवरीच्या प्रियकराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भरवरातीतून नवरीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. यावेळी नवरामुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाणही करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार नवरीच्या सहमतीने केला असल्याचं समोर आलं आहे.

2/4

नवरामुलगा खूंटीमधील तर मुलगी नगडी येथील रहिवासी आहेत. नवरीचा प्रियकर शहरातील बांधकाम सुरु असलेल्या विधानसभेजवळ आधीपासूनच तिची वाट पाहत होता. गाडी जशी या भागात पोहचली त्यावेळी प्रियकर नवरीला घेऊन फरार झाला. 

3/4

गाडीमध्ये असणाऱ्या नवऱ्याने सांगितलं की, पाठवणीचा कार्यक्रम झाल्यानंतर गाडीतून खूंटी येथे निघालो होतो. त्यावेळी धुर्वा भागात नवरीच्या प्रियकराने गाडी थांबवली आणि नवरी गाडीतून उतरुन प्रियकराच्या दुचाकीवर बसून फरार झाली. यावेळी नवरीच्या प्रियकराकडून मुलाला शिवीगाळही करण्यात आली.

4/4

गाडीत बसलेल्या नवरीने बाहेरुन केवळ एक आवाज आल्यावर स्वत:च कारचा दरवाजा उघडला आणि कार थांबवणाऱ्या प्रियकराच्या बाईकवर जाऊन बसली. या प्रकाराबाबत मुलाकडील नातेवाईकांना काहीच समजत नव्हतं. मुलाकडील कुटुंबियांनी याबाबत धुर्वा पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीत मुलीने प्रियकरासोबत हा प्लान केल्याचं समोर आलं. त्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने पोलीसांत आत्मसमर्पण केलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.