Brij Bhushan Singh: '...तर मी राजीनामा देईन'; मोदींचं नाव घेत बृजभूषण सिंह हे काय म्हणाले!!

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध खुद्द कुस्तीगिरांनी दंड थोपटले आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारलं आहे. ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

May 01, 2023, 00:04 AM IST

Brij Bhushan Sharan Singh : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध खुद्द कुस्तीगिरांनी दंड थोपटले आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारलं आहे. ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

1/5

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह याच्या विरोधात महिला खेळाडूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता.  

2/5

लैंगिक शोषण संरक्षण (POSCO) कायद्यासग भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय. त्यानंतर आता  ब्रिजभूषण सिंह राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

3/5

अशातच आता ब्रिजभूषण सिंह यांनी आपलं मत सर्वांसमोर मांडलं आहे. मी राजीनामा देत नाहीये त्याचं कारण लोकांनी माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे, असं ब्रिजभूषण सिंह म्हणतात.

4/5

मी गुन्हा केला नाही. लोकांच्या आरोपांचा अपराधी बनून कसं राहणार?, असा सवाल ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी विचारला आहे.

5/5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं तर लगेच राजीनामा देईन. फक्त मोदीच नाही तर अमित शाह, जेपी नड्डा यांच्यापैकी कुणीही सांगितलं तरी राजीनामा देईन, असं ते म्हणतात.