1 हजार वर्षे जुने भारतातील सर्वात रहस्यमयी शिव मंदिर! वैज्ञानिकांनाही उलगडले नाही कोडे

Jul 24, 2023, 21:17 PM IST
1/12

तामिळनाडू राज्यातील तंजावर शहरात बृहदेश्वर हे मंदिर आहे. भगवान शंकराचं हे मंदिर चोल राज्याच्या राजांनी बांधले आहे.

2/12

इतकं भव्यदिव्य मंदिर अवघ्या 7 वर्षांत बांधून पूर्ण झालं. मात्र, वैज्ञानिकांना देखील गोष्ट अविश्वसनीय अशी वाटते. 

3/12

मंदिर बांधताना ते लॉकींग पद्धतीने बांधले गेले असून कुठेही सिमेंट, चुना, रेतीचा वापर केला गेलेला नाही. यामुळे या मंदिराचे बांधकाम पाहून भले भले इंजिनियरी शॉक होतात.

4/12

या मंदिरासाठी 1 लाख 30 हजार टन ग्रॅनाईट दगडाचा वापर करण्यात आला आहे.  हा दगड या परिसरात कुठेही मिळत नाही. त्यामुळे ग्रॅनाईटच्या इतक्या प्रचंड शिळा येथे 1 हजार वर्षांपूर्वी कशा आणल्या गेल्या असतील याचेही गूढ आहे.

5/12

1987 साली या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे.

6/12

या मंदिराला पायाच नाही. दिसायला हे मंदिर पिरॅमिडसारखे दिसते.

7/12

या मंदिरासाठी बांधण्यात आलेला चबुतरा 16 फूट उंच आणि आजही तितकाच भक्कम आहे.

8/12

मंदिरासमोर असलेला नंदी हा जगातील दोन नंबरचा मोठा नंदी आहे. 16 फूट लांब आणि 13 फूट उंचीचा हा नंदी अखंड दगडातून कोरला गेला आहे.

9/12

जगातले हे सर्वात उंच मंदिर समजले जाते. 6 किमीचा रँप बनवून त्यावरून हा कळस हत्तींच्या सहाय्याने ओढून नेऊन बसविला गेला असावा असे बोलले जाते. हे मंदिर इतके उंच आहे की तंजावर शहरातून कुठूनही दिसते.  

10/12

बृहदेश्वर शिवमंदिर आजही संशोधकांसाठी रहस्यमयी मंदिर राहिले असून या मंदिराच्या भव्य शिखराची सावली जमिनीवर पडत नाही.

11/12

हे मंदिर  जवळपास 66 मीटर उंच आहे. या मंदिात एकूण 13 मजले आहेत.

12/12

या मंदिराची निर्मिती 11 व्या शतकात म्हणजे.  इसवी सन 1003 ते 1010 या कालावधीत झाली  असल्याचा अंदाज आहे.