बुध ग्रहामुळे तयार होतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 5 राशींवर पडणार नोटांचा पाऊस, मिळणार अमाप पैसा

Budh Gochar 2023: सध्या सिंह राशीत असणारा बुध ग्रह लक्ष्मी नारायण राजयोग तयार करत आहे. हा राजयोग 5 राशींसाठी फार शुभ आणि अमाप संपत्ती देणारा आहे.   

| Aug 04, 2023, 11:01 AM IST

Budh Gochar 2023: सध्या सिंह राशीत असणारा बुध ग्रह लक्ष्मी नारायण राजयोग तयार करत आहे. हा राजयोग 5 राशींसाठी फार शुभ आणि अमाप संपत्ती देणारा आहे. 

 

1/7

बुध ग्रहामुळे तयार होतोय लक्ष्मी नारायण राजयोग

बुध हा संपत्ती, व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्क आणि संवादाचा कारक आहे. कुंडलीत बुध शुभ असेल तर व्यक्ती मोठा व्यापारी, हुशार आणि संवादशैलीत निपुण बनतो. म्हणूनच बुध ग्रहाच्या स्थितीतील बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.   

2/7

5 राशींवर लक्ष्मीची कृपा, नारायण राजयोगामुळे मिळणार अमाप पैसा

25 जुलै 2023 रोजी, बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. बुध सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो. सर्व 12 राशींच्या जीवनावर याचा मोठा प्रभाव पडत आहे. दुसरीकडे, बुध संक्रमणापासून बनलेला लक्ष्मी नारायण योग काही लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.  

3/7

मेष

मेष सिंह राशीत बुधाच्या प्रवेशामुळे तयार झालेल्या लक्ष्मी नारायण राजयोगाचा मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नफा कमावतील, प्रगती होईल. तुमचा वेळ चांगला जाईल. विद्यार्थ्यांना फायदा होईल.  

4/7

मिथुन

मिथुन बुधाच्या राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह असून या राशीच्या लोकांवर त्याचा विशेष आशीर्वाद असतो. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. आरोग्य चांगले राहील. पद, सन्मान मिळेल. विशेषत: लेखनाशी संबंधित लोकांना फायदा होईल.  

5/7

सिंह

सिंह  बुधने गोचर करत सिंह राशीत प्रवेश केला असून, लक्ष्‍मी नारायण राजयोग तयार करत आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. थांबलेला, अडकलेला पैसा मिळेल. नुकसानातून बाहेर पडाल. तसंच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. याशिवाय पैसे साठवण्यात तुम्हाला यश मिळेल.   

6/7

तुळ

तुळ  तुळ राशीच्या लोकांना बुध गोचरचा फार लाभ देईल. लक्ष्मी नारायण योग या लोकांना नशिबाची पूर्ण साथ देईल. तसंच नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल. विशेषत: जे सर्जनशील क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना विशेष लाभ मिळेल.  

7/7

कुंभ

कुंभ  बुधचा राशी गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी फार शुभ आहे. यांना करिअर आणि व्यापारात फार लाभ मिळेल. तसंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य चांगलं राहिल. आयुष्यातील प्रेमही चांगलं असेल. तुम्हाला सहकाऱ्याची साथ मिळेल. बाळाचं सुख मिळू शकतं.