Photo: जगातील सर्वात वेगवान असल्याचा या गाडीला मान, टॉप स्पीड 482 किमी प्रतितास

कारप्रेमींना गाडीच्या लूकसोबत त्याचा वेगही आकर्षित करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात वेगवान कार कोणती आहे आणि किती वेगाने धावू शकते? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. 

Nov 08, 2022, 21:03 PM IST

Bugatti Chiron Super Sport 300+: कारप्रेमींना गाडीच्या लूकसोबत त्याचा वेगही आकर्षित करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात वेगवान कार कोणती आहे आणि किती वेगाने धावू शकते? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. 

1/5

Bugatti Chiron Super Sport 300

जगातील सर्वात वेगवान कार बुगाटी शिरॉन सुपर स्पोर्ट 300+ आहे. यात 7993cc, Quad Turbocharged, W16, DOHC पेट्रोल इंजिन आहे.

2/5

Bugatti Chiron Super Sport 300

या गाडीत 7-स्पीड DSG ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. बुगाटी शिरॉन सुपर स्पोर्ट 300+ चा टॉप स्पीड 490.4847 किमी प्रतितास (304.773mph) आहे.

3/5

Bugatti Chiron Super Sport 300

2019 मध्ये या गाडीचा वेग पाहून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले होते. बुगाटी फक्त सुपर स्पोर्ट कारसाठी ओळखली जाते.

4/5

Bugatti Chiron Super Sport 300

या कारच्या फक्त 30 युनिट्सचे उत्पादन करण्यात आलं असून सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. कारची डिझाईन पाहूनच कारप्रेमी या गाडीचे चाहते झाले आहेत.

5/5

Bugatti Chiron Super Sport 300

बुगाटी शिरॉन सुपर स्पोर्ट 300 प्लस या गाडीची किंमत सुमारे 4 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय चलनात 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. मात्र, कोणी भारतात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत आणखी जास्त होईल.