मुंबईतल्या झांझ पथकावर काळाचा घाला... बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू

Old Pune Mumbai highway : मुंबई पुणे जुन्‍या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात 12 जणांचा मृत्‍यू झाला आहे. जखमींवर खोपोलीच्‍या पालिका रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना कोमोठे येथील एमजीएम रूग्‍णालयात हलवण्‍यात आले आहे.

Apr 15, 2023, 10:05 AM IST
1/6

Old Pune Mumbai highway bus accident

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे घडली आहे.  

2/6

bus collapsed at boarghat

पहाटे चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 29 जण गंभीर जखमी झाले आहे. या बसमधून एकूण 40 ते 45 जण प्रवास करत होते.

3/6

Borghat bus accident

जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट 200 फूट दरीत कोसळली. या अपघातात बसचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे.

4/6

bus accident

अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. बसमध्ये 40 ते 50 जण असल्याने सर्वांना बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र त्यातील काही जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यास मोठ्या अडचणी येत होत्या.

5/6

pune police

अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अंधार असल्याने मदत पोहचवण्यात पोलिसांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

6/6

accident rescue team

यासह अपघातग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, यशवंती हायकर्स, शिवदुर्ग टीम यांनीही धाव घेतली होती. डॉक्‍टरांचे पथकही रूग्‍णवाहिकांसह घटनास्‍थळी पोहोचली होते. दुर्गम भाग असल्‍याने मदत कार्यात अडथळे येत होते.