Business Idea : घराच्या छताचा असा वापर करून तुम्ही होऊ शकता कोट्याधीश

घराच्या छतावरून अनेक प्रकारचे बिझनेस सुरू करता येतात. या बिझनेसचं विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूक करुन देखील लाखोंची कमाई तुम्ही करु शकता. आज आम्ही तुम्हाला याच Business Idea बद्दल सविस्तर सांगणार आहोत.

Jun 11, 2022, 16:15 PM IST

जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल पण तुमच्याकडे भांडवल कमी असेल तर तुम्ही घराच्या छतावरून तुमचं काम सुरू करू शकता. तुम्ही कोणत्याही शहरात किंवा गावात किंवा मेट्रो शहरात कुठेही राहत असाल आणि तुमच्याकडे छत असेल तर तुम्ही भरगच्च कमाई करू शकता.

1/5

जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे सौरऊर्जेबाबत लोकांची जागरुकता वाढलीये आणि सरकारही त्याला प्रोत्साहन देत आहे. म्हणून हिच ती योग्य वेळ कि तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर प्लांट (Solar plant) बसवून डबल फायदा घेऊ शकता. जेणेकरुन तुमची वीज बिलाचीही बचत होईल आणि तुम्हाला चांगले पैसेही मिळतील.

2/5

सध्या आपल्या देशात टेरेस फार्मिंगची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर ग्रीन हाउस बांधावं लागेल. जिथं भाजीपाल्याची रोपं पॉलीबॅगमध्ये लावता येतात आणि ठिबक पद्धतीने सिंचन करता येतं. तापमान आणि मॉयश्चर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला त्याच्या इक्विपमेंट वापरावे लागतील. पॉलीबॅगमध्ये माती आणि कोकोपीट भरावं लागेल. यासाठी तुम्ही सेंद्रिय खतांचाही वापर करू शकता. एकदा का लोकांना तुमच्याबद्दल बिझनेसची माहिती झाली की, लोक स्वतःच तुमच्यापर्यंत ताजी भाजी घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क करतील. तुमचा बिझनेस वाढल्यानंतर, तुम्ही होम डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी ठेवू शकता आणि आणखी एका गरजुला रोजगार देऊ शकता.

3/5

जर तुमच्या घराचं छत रिकामं असेल आणि तुम्ही त्याचा विशेष वापर करत नसाल तर तुम्ही ते मोबाईल कंपन्यांना भाड्याने देऊ शकता. छतावर मोबाईल टॉवर बसवून कंपन्या तुम्हाला दर महिन्याला चांगली रक्कम देतील. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडून 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' घ्यावं लागेल आणि स्थानिक पालिकेची परवानगी सुद्धा घ्यावी लागेल.

4/5

जर तुमची बिल्डिंग प्राइम लोकेशनवर असेल किंवा ती दूरवरून सहज दिसत असेल किंवा कोणत्याही मुख्य रस्त्यालगत असेल, तर तुम्ही तुमच्या छतावर होर्डिंग्ज लावून भरगच्च पैसे कमवू शकता. प्रत्येक शहरात अशा अनेक जाहिरात एजन्सी आहेत, ज्या आउटडोर जाहिरातींचे काम करतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अशा एजन्सीशी संपर्क साधू शकता, जी सर्व प्रकारची मंजुरी घेतल्यानंतर तुमच्या घराच्या छतावर होर्डिंग्ज लावेल. पण होर्डिंग लावण्यापूर्वी एजन्सीची मंजुरी आहे की नाही याची माहिती करुन घ्या नाहीतर तुमच्यावर सरकारी कारवाई देखील केली जाऊ शकते.

5/5

जर तुमच्याकडे बिझनेस सुरू करण्यासाठी पुरेसं भांडवल नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अशा अनेक बँका तुम्हाला काही ठराविक बिझनेस करायला कर्ज देऊ शकतात.